✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात सुसज्ज असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी तालुक्यातील प्रत्येक नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे दि. 25 एप्रिल 2023 मंगळवारला हिंगणघाट शासकिय वैद्यकिय महाविद्यालय संघर्ष समितीच्या माध्यमातून परिसरातील सर्व नागरिकांनी हिंगणघाट येथे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व्हावे या करिता जनजागृती रॅली काढून शहर बंदचे आवाहन केलेले आहे.
हा बंद कोणाच्याही विरुद्ध नसुन शासन व प्रशासन यांना जनतेच्या भावना कळाव्या या करिता सर्व समावेशक बंद ठेवलेला आहे. यात विविध सामाजिक व व्यवसायीक संस्था व संघटना, सर्व राजकिय पक्ष तसेच विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक, शिक्षक, इंजिनिअर, वकिल, डॉक्टर, शेतकरी व शेतमजुर, संघटित व असंघटित कामगार व सर्व हिंगणघाट शहरातील जनतेला निमंत्रित असून सर्वांनी सकाळी 8:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हिंगणघाट येथे उत्स्फुर्तपणे गोळा होऊन जनजागृती रॅलीत सहभागी व्हावे असे आव्हान हिंगणघाट वैद्यकिय महाविद्यालय संघर्ष समिती तर्फे करण्यात आले.
चला हिंगणघाट शहराच्या विकासासाठी हातभार लावूया आणि एक नवा इतिहास घडवूया प्रत्येक हिंगणघाट वासियांनी विध्यार्थ्यांच्या भावी जीवनातं आमुलग्रह बदल घडून आणण्यासाठी दिनांक 25 एप्रिल 2023 ला होणाऱ्या शासकीय मेडिकल कॉलेज हिंगणघाट नगरीत झाले पाहिजे, हा ध्यास मणी बाळगून तण मन धनाने सहकार्य करावे. शासकीय मेडिकल कॉलेज हे हिंगणघाट नागरीतच उभारले गेले पाहिजे म्हणून सबका साथ, शासकीय मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहर व तालुक्यातील आरोग्य विषयी हे समस्या ध्यानात ठेऊन सर्व हिंगणघाटकरानी या आंदोलनात सहभाग दर्शवून आवर्जून भाग घ्यावा. तरच हिंगणघाट नगरीचे स्वप्न साकार होण्यास काहीच वेळ लागणार नाही. प्रत्येक पुरुष, प्रत्येक महिला प्रत्येक मुले, प्रत्येक मुली प्रत्येक व्यापारी, प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक दुकानदार, प्रत्येक फुटफाट धंदेवाले, प्रत्येक सर्व पार्टीचे नेतागण, शेतकरी, शेतमजूर, प्रत्येक लहान मोठे व्यापारी, प्रत्येक प्राध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी,. नॉन टिचिंग स्टॉप या सर्वानी सर्व नागरिक तसेच सर्व धर्मीय नागरिक या आंदोलनात सहभागी होऊन शासकीय मेडिकल कॉलेज हिंगणघाट ची शान समजून सर्व बांधवानी मोलाचे सहकार्य करावे दिनांक 25 एप्रिल 2023 जन आंदोलनात सहभागी व्हावे.