संदिप सुरडकर नागपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- मध्ये गुरुवारी आलेल्या अवकाळी भयंकर वादळी पावसाने 4 लोकांचे जीव घेतला. त्यामुळे हा अवकाळी पाऊस नागपूरात बळी घेणारा पाऊस ठरला.
नागपूर शहरातील या 4 मृत्यू मध्ये पहिली घटना गोंडवाना चौकाजवळील जे. पी. हाइट्सच्या सुरक्षा भिंतीखाली दबून मायलेकांचा मृत्यू झाला. तर दुसरी घटना न्यू मनीषनगर परिसरात मूळचे छत्तीसगड येथील असलेल्या मजूर पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची बाबदेखील समोर आली आहे. या दाम्पत्याचा मृत्यू डोक्यावर घराचे ‘टिन’ पडून झाला आहे. वादळासह आलेल्या अवकाळी पावसामुळे आतापर्यंत चार जणांचे बळी गेले आहेत.
गौरीलाल सुतूराम पटेल वय 32 वर्ष व रामला गौरीलाल पटेल वय 31 वर्ष अशी या दाम्पत्याची नावे आहेत. ते दोघेही मूळचे छत्तीसगड राज्यातील बलोदा बाजार येथील सोलदा गावचे होते. नागपुरात ते काम करायचे. सांझविला, गुरुछाया सोसायटी, न्यू मनीष नगर येथे साइटचे काम सुरू होते. त्यांच्या झोपड्याला वरून ‘टिन’ लागले होते. मात्र सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ‘टिन’ हवेत उडाले व ते वेगाने खाली पडले. त्यावेळी दोघेही पती-पत्नी आतच होते. त्यांच्या डोक्यावरच ‘टिन’ पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना जवळपासच्या नागरिकांनी तातडीने एम्स इस्पितळात उपचारा साठी नेले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. आई वडिलांच्या मृत्यूनंतर दोन मुले झाली पोरकी झाली आहे.
बेलतरोडी पोलिस ठाण्याचे एपीआय अनिल मेश्राम हेदेखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या परिसरात अनेक ठिकाणी बांधकाम सुरू असून, कामगार टिनाच्या झोपड्यां मध्येच राहतात. गुरुवारी आलेल्या वादळी पावसामुळे अनेकांच्या घराचे छत अशाच प्रकारे उडून गेले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पटेल यांच्या नातेवाइकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

