Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंद्रपुर येथे समोर आली केमिकल युक्त बनावट दारूची कंपनी, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने केला कंपनीचा पर्दाफाश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 24, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपुर येथे समोर आली केमिकल युक्त बनावट दारूची कंपनी, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने केला कंपनीचा पर्दाफाश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हानीशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- आज पैसे कमविण्यासाठी आज लोक नागरिकांच्या आरोग्यावर उठले आहे. अशीच एक खळबळजनक घटना चंद्रपूर येथून समोर आली मध्य प्रदेश राज्यात दारु स्वस्त असल्यामुळे तिथून आयात करून या विदेशी मद्यात नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक असलेले पदार्थ दारुत टाकून बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकला आहे. या कारवाईत केमिकल युक्त दारूचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. रवींद्र उर्फ बिट्टू कंजर असे आरोपीचे नाव आहे.

अवैधरित्या होत होती विदेशी दारू विक्री : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र उर्फ बिट्ट कंजर हा आरोपीचे चंद्रपूर शहरातील जालनगर वॉर्डातील कंजर मोहलयात स्वतःच्या घरी मध्य प्रदेशातून अवैधरित्या विदेशी दारू आणत होता. बाटलीतील दारू काढून त्यात आरोग्यास अपायकारक असलेल्या अमली पदार्थाची भेसळ आरोपी करीत होता. भंगारातून गोळा केलेली दारूच्या बाटलीत तो रॉयल स्टॅग, डिलक्स व्हिस्की कंपनीच्या नावाने बनावट दारू भेसळ करीत होता. याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.

घरीच तयार होत होती बनावट दारू:
त्याआधारे आरोपी रवींद्र उर्फ बिट्ट कंजर याच्या घरावर छापा टाकला असता, त्याच्या राहत्या घरी बनावट दारू तयार करण्याचे साहित्य सापडले आहे. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता त्यांना जुन्या रॉयल स्टॅग, डिलक्स व्हिस्कीच्या बाटल्यांचे तुटलेले बुचेस, नवीन बनावट झाकण, जुन्या 180 मिलीच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या, ऑफिसर्स चॉईस, व्हिस्की कंपनीच्या 90 मिलीच्या रिकाम्या बाटल्या, मध्य प्रदेश सरकारचे पेपर लेबल सापडले आहे. बनावट मद्याची बाटली भरण्यासाठी वापरण्यात येणारी एक प्लास्टिकची चाळी, 10 लिटर भेसळयुक्त द्रव असलेले दोन 5 लिटरचे प्लास्टिकचे कॅन, 31 हजार 925 रुपये किमतीचे भेसळयुक्त लालसर द्रव असलेले 5 लिटरचे कॅन पोलिसांनी जप्त केले आहेत.

विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल:
बनावट केमिकल युक्त दारु प्रकरणी पोलिसांनी 420, 328 कलमा अन्वये रामनगर पोलीस स्टेशन येथे आरोपी रवींद्र उर्फ बिट्ट रणधीर कंजर विरुद्ध भादंवि कलम 65 (अ). 65 (ब), 65 (ड), 65 (इ). ६५ (च). 67. महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 67 (1) (अ), 67 (क), 108 तसेच कॉपीराइट कायदा 1957 चे कलम 63 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

रुग्णसेवक व सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांचा जाहीर सत्कार

Next Post

मुंबईत ज्वेलर्सने भारतीय स्टेट बँकेला घातला तब्बल 405 कोटींचा गंडा, 2018 पासून आरोपी बेपत्ता.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुंबईत ज्वेलर्सने भारतीय स्टेट बँकेला घातला तब्बल 405 कोटींचा गंडा, 2018 पासून आरोपी बेपत्ता.

मुंबईत ज्वेलर्सने भारतीय स्टेट बँकेला घातला तब्बल 405 कोटींचा गंडा, 2018 पासून आरोपी बेपत्ता.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In