✒️प्रविण जगताप,वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय जुदो स्पर्धेत भारत विद्यालय हिंगणघाटची विद्यार्थीनी कु. मानसी राजेंद्र गाठे वर्ग 10 वा हिने राज्यस्तरावर सुर्वणपदक प्राप्त करित आपली निवड राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरिता केली. तसेच विद्यालयाच्या कु.भक्ती रवींद्र दुरबुडे वर्ग 7 हिने द्वितीय स्थान प्राप्त करून रौप्य पदक प्राप्त केले. तसेच कु. रुचिता रवींद्र शेंडे वर्ग 8 वा व मोनीका गेडेकार वर्ग 9 वा या दोन खेळाडूला कास्य पदक प्राप्त झाले.
सुर्वणपदक प्राप्त विद्यार्थीनी कु. मानसी राजेंद्र गाठे हिचा भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक बळीराम चव्हाण यानी विद्यालया तर्फे ट्रॅक सुट भेट देवुन सत्कार केला. सुर्वणपदक, रौप्य पदक व कास्य पदक विजयी विद्यार्थीनीचे व क्रिडा शिक्षक विनोद कोसुरकर यांचे प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन सोसायटी, हिंगणघाटचे अध्यक्ष गोकुलदासजी राठी, उपाध्यक्ष श्यामजी भीमनवार, सचिव रमेशराव धारकर, सहसचिव संजयराव देशपांडे व सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक बळीराम रा चव्हाण उपमुख्याध्यापक उदय भोकरे पर्यवेक्षिका कु. प्रतिभा शंभरकर व निलांक्षी बुरीले तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक विनोद कोसुरकर यांचे अभिनंदन व कौतुक केले