पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
गुन्हे शाखा युनिट ३ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. २४/०४/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट ३. पुणेकडील सहायक पोलीस फौजदार संतोष क्षीरसागर यांना बातमी मिळाली की, पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार नामे जयवंत उर्फ जयडया उर्फ जेवी गोवर्धन गायकवाड वय ३४ वर्षे रा. आंबेडकर वसाहत, डि. पी. रोड, सुरज प्रोव्हिजन स्टोअर शेजारी, आंध्र, पुणे हा भुमकर चौक, नन्हे. पुणे येथे असलेबाबत बातमी मिळाल्याने त्यास सदर ठिकाणी जावून शोध घेता तो एक स्क्रू ड्रायव्हर एक अंडजेस्टेबल पाना, एक लोखंडी छोटी चपटी कटावणी या घरफोडीच्या हत्यारांसह मिळून आला. त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे केले तपासात त्याने सिंहगड रोड पोलीस ठाणे, सांगवी पोलीस ठाणे तसेच तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यांचे हददीमध्ये घरफोडी चोरी केल्याचे सांगीतल्याने तपासानंतर त्यास सदर गुन्हयात अटक करून त्याचेकडून २०० ग्रॅम वजनाचे दागिने किं. रु.११.००,०००/- चे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत. त्यांचेकडून सिंहगड रोड पोलीस ठाणेकडील १, सांगवी पोलीस ठाणेकडील ३ व तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याकडील १ असे एकुण ५ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
आरोपी जयवंत उर्फ जयडया उर्फ जेडी गोवर्धन गायकवाड वय ३४ वर्षे रा. आंबेडकर वसाहत, डि. पी. रोड, सुरज प्रोव्हिजन स्टोअर शेजारी, आंध्र, पुणे हा पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याचेविरुध्द पुणे शहर परीसरात घरफोडी चोरीचे ८० पेक्षा जास्त गुन्हे नोंद आहेत.
सदरची कामगिरी ही. मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह-आयुक्त, पुणे शहर श्री संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर, श्री. सुनिल पवार गुन्हे शाखा युनिट-३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीहरी बहिरट, पोलीस उप-निरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस उप- निरीक्षक राहुल पवार, पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, किरण पवार, सुजीत पवार, संजिव कळंबे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, सतीश काळे, प्रकाश कटटे, साईनाथ पाटील, प्रताप पडवाळ, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांचे पथकाने केली आहे.
दाखल गुन्हयाचा पुढिल तपास अजितकुमार पाटील पोलीस उप-निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ३, पुणे शहर हे करीत आहेत.