✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जील्हातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक काल पाड पडल्या वर्धा जिल्हात महाविकास आघाडीने जोरदार विजय मिळवून भाजपा युवतीला बाजार समितीच्या आज झालेल्या निवडणूकीत वर्धा, सेलू व देवळी बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असून भाजपचा मात्र पराभव झाला आहे. सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख यांच्या नेतृत्वात या आघाडीने मजल मारली असून देशमुख यांचे चिरंजीव डॉ.संदीप देशमुख यांनी सर्वप्रथम विजय नोंदविला. वर्धा बाजार समितीत १८ पैकी १० जागांवर आघाडीचे उमेद्वार विजयाच्या टप्यात असून उर्वरीत जागांवरसुध्दा आघाडीचे उमेद्वार घौडदौड करीत आहे.
सेलू बाजार समितीत १८ पैकी १५ जागांवर आघाडीचे उमेद्वार निवडून आले आहे. या ठिकाणी प्रा.देशमुख, काँग्रेसचे शेखर शेंडे व शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देवतारे यांच्या संयुक्त आघडीने बाजी मारली. देवळीत महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून आले. अठरा पैकी सोळा जागांवर निवडून आले असून दोन अविरोध जागा याच आघाडीकडे आहेत. या तीनही ठिकाणी भाजपचे खासदार रामदास तडस व आमदार डॉ.पंकज भोयर यांनी ताकद लावली होती. पण मतदारांनी त्यांना नाकारले आहे.