१८ पैकी ११ जागेवर विजय : तिन्ही राष्ट्रीय पक्षाचे आजी माजी आमदारांना पुरून उरले आविसं युवा नेते अजयभाऊ कंकडालवार
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- कृषि उत्पन्न बाजार समितीचे सार्वत्रिक निवडणूक काल १८ जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडले असून आज मतमोजणी झाली असून आदिवासी विद्यार्थी संघ तथा अजयभाऊ कंकडालवार गटाचे समर्पित १८ पैकी ११ जागेवर दणदणीत विजय मिळवले असून या निवडणुकीत सार्वत्रिक निवडणुक सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून श्री रविंद्रराव भगवंतराव आत्राम, श्री सैनु मादी आत्राम, श्री अनिल सोमाजी करमरकर, श्री अजय रामय्या कंकडालवार, बोदी कोलु बोगामी, सहकारी संस्था महिला राखीव गटातून मालुताई रामा ईस्टाम, निर्मला अशोक येलमुले, सहकारी संस्था इ. मा. व. गटातून अजय रामय्या कंकडालवार, सहकारी संस्था वि.जा./भ. ज. गटातून येल्ला मूत्ता तोकला, विजयी झाले आहेत.
विशेष म्हणजे अहेरी विधानसभेतील तिन्ही राष्ट्रीय पक्षाचे आजी-माजी आमदार व मोठे नेते यांनी एकत्रित येवून यूती करून आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवाराला कृषि उत्पन्न बाजार समितीतून बाहेर ठेवण्यासाठी खूप मोठी खेळी करण्यात आली मात्र आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात सदर निवडणुका लढवण्यात आली असून तिन्ही पक्षांना धोबीपछाड केले असून ११ उमेदवार निवडून आणले असून अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीत एक हात्ती सत्ता स्थापन केले असून समोर होऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आदिवासी विद्यार्थी संघटना एकप्रकारे दबदबा तयार करून राष्ट्रीय पक्षांना साडो की पडो करणार असून अहेरी विधानसभा क्षेत्रांतील तिन्ही राष्ट्रीय पक्षाचे आजी माजी आमदाराना डोकेदुखी ठरणार आहे.
मतमोजणी झाल्यावर अहेरी शहरांत विजयी रैली काढून फटक्यांच्या अतिषबाजी करत विजयी मिरवणूक काढण्यात आली असून या मिरवणुकीत आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते नंदूभाऊ मट्टामी, पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ. सोनालीताई कंकडालवार,अहेरीचे नगराध्यक्ष कु.रोजा करपेत,उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, माजी सभापती भास्कर तलांडे,माजी सभापती सौ. सुरेखा आलाम, माजी उपसभापती सौ. गीताताई चालुरकर, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी जिल्हा परिषद सदस्या कु. सुनीता कुसनाके, प्रज्वल नागुलवार आविस सचिव, आविस सल्लागार अशोक येलमुले, सरपंच दिलीप मडावी, माजी सरपंच गुलाब सोयाम, माजी सरपंच प्रमोद आत्राम, भामरागड तालुका अध्यक्ष लालसु आत्राम, लक्ष्मीकांत बोगामी, उपसरपंच वैभव कंकडालवार, सत्यम नीलम, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नगरसेवक विलास सिडाम, नगरसेवक, महेश बाकेवार, नगरसेवक विलास गलबले, ग्राम पंचायत सदस्य राजू दुर्गे, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेक, कार्तिक तोगम, प्रकाश दुर्गे, लक्ष्मण सड़मेकसह अहेरी एटापल्ली, भामरागड तालुक्यांतील आविस व अजयभाऊ मित्र परिवारचे पद्द्धिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.