✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावंगी मेघे (वर्धा):- येथे फिर्यादी निर्मला गजानन शिवरकर वय 47 वर्ष रा. निमगाव सबाने ता. जि.वर्धा यांनी तोंडी रिपोर्ट दिला कि, नमुद घटना ता. वेळी व स्थळी फिर्यादीचे बहीनीची मुलगी मनीषा हिची डिलेव्हरी झाल्याने त्या सेवाग्राम हाँस्पीटल येथे होत्या तेव्हा फिर्यादीची मुलगी पल्लवी हिला तीचे काका पवन चौधरी यांनी सांगीतले की, तु घरी जा व कपाटातील दागीने आहे किंवा नाही ते बघ असे म्हटले असता तीने दागीने बघीतले तर तीला कपाटात ठेवलेले 1) एक सोण्याची मोठी पोत अंदाजे 3 ग्रॅम वजनाची कि. अ. 9000 रू. 2)एक सोण्याची लहान पोत 3 ग्रॅम वजनाची कि. अ. 9000 रूपये 3) तीन जोड चांदीच्या तोरड्या दोन ग्रॅम कि. अ.1000 रूपये असा एकुन जुमला की. 19,000 रूपये चे सोन्या चांदीचे दागीने मिळुन आले नाही. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे. सावंगी येथे येथे अप. क्र. 253/ 2023 कलम 380 भा.द.वी. चा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
आम्ही सदर गुन्हाचे तपासात असताना खास बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की सदर गुन्ह्यातील संशईत आरोपी कुणाल दिगांबर जुगनाके वय 28 वर्ष रा. निमगाव सबाने हा त्याचे गावामधे फिरत आहे. अशा माहितीवरुन त्याला ताब्यात घेउन पोलीस स्टेशनला आणुन गुन्हासंबधाने सखोल विचारपुस केली असता त्यांने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला दि. 27 एप्रिल रोजी सदर गुन्हात अटक करुन त्याचा दि.28 एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त झाल्याने आरोपी कडुन मेमोरंडम पंचनाम्यां प्रमाणे 1) एक सोण्याची मोठी पोत अंदाजे 3 ग्रॅम वजनाची कि. अ. 9000/- रू. 2) एक सोण्याची लहान पोत 3 ग्रॅम वजनाची कि.अ. 9000/- रू. 3) तीन जोड चांदीच्या तोरड्या दोन ग्रॅम कि. अ. 1000/- रू. असा एकुन जुमला की. 19,000 /-रू. माल आरोपी कडुन जप्त करण्यात आला.
सदर गुन्हाचा तपास पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी आबुराव सोनोने यांचे मार्गदर्शनात ठाणेदार धनाजी जळक यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकातील पो.हवा. विजय पंचटिके, ना.पो.शी.भुषन निघोट, प्रशांत वंजारी, संदीप खरात,स्वप्नील मोरे, दुर्गेश बांन्ते, प्रविण शेंडे यांनी केला. पुढील तपास पो.हवा. विजय पंचटिके पोलीस स्टेशन सावंगी मेघे हे करीत आहे.