सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- भारतीय बौद्ध महासभेच्या राजुरा तालुक्याच्या वतीने या मधुगंधा गौतम जुलमे रा. राजुरा हीचा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी कृषी विभाग मध्ये उप संचालक या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षा महाराष्ट्र राज्यातून अनुसूचित जाती महिला मधून प्रथम आली. तसेच महाराष्ट्र राज्याच्या गुणवत्ता यादीत ६० वा क्रमांक पटकावला आहे. तिने स्वतः ताचे आई वडीलांचे गाव अहेरी असून राजुरा तालुकाचे नाव महाराष्ट्र राज्यात सर्वत्र उंचावून यशोशिखर गाठले आहे.
मधुगंधा गौतम जुलमे यांनी यावेळी आपल्या मनोगत मध्ये म्हटले की, आपले शिक्षण पदवी व पदव्युत्तर महात्मा जोतिबा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मध्ये शिकली तिने स्पर्धा परीक्षेची तयारी जगत गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय राजुरा येथे अभ्यास करून आपल्या प्रचंड मेहनत व जिद्दच्या बळावर तिने यश मिळविले तिच्या यशाबद्दल भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका, शहर, ग्राम शाखा व वैशाली महिला मंडळ राजुरा कडून “सम्यक बौध्द विहार सोमनाथपुर वॉर्ड राजुरा” येथे मधुगंधा गौतम जूलमे हीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि तिच्या यशाबद्दल मान्यवरांनी आपले मनोगत मधून मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात भारतीय बौध्द महासभा राजुरा व वैशाली महिला मंडळ राजुरा चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपासक उपासिका उपस्थित होते.