विक्की डोके, भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- जिल्हातील महत्वपूर्ण लाखांदूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची 13 संचालक पदासाठी 30 एप्रिल रोजी निवडणूक होऊन निकाल जाहिर करण्यात आला. या बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकाला नंतर हे स्पष्ट झाले आहे की, बाजार समितीवर काँग्रेस पॅनलच्या दणदणीत विजय होऊन पुन्हा एकदा सत्तेची चावी मिळवली आहे. काँग्रेस प्रणित शेतकरी-शेतमजूर-बहुजन विकास पॅनलचे-8 व अविरोध-3, भाजप-राष्ट्रवादी युती प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनलचे 5 व अविरोध 2 असा निकाल घोषित करण्यात आला. तर राष्ट्रवादीला या निवडणुकीत खाते उघडले नाही.
लाखांदूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवणुकीमध्ये काँग्रेस समर्थित पॅनलचे सुभाष राऊत, लोकेश भेंडारकर, ओमप्रकाश सोनटक्के, मनोहर राऊत, मनोज मेश्राम, सुरेश ब्राह्मणकर, अविनाश शिवणकर, रामभक्त मिसार, रजनी घोरमोडे, देविदास पारधी, ज्ञानेश्वर बुरडे विजयी झाले. तर भाजप-राष्ट्रवादी युती पॅनलचे प्रमोद प्रधान, मुकेश भैय्या, प्रतिभा देशमुख, प्रकाश शिवनकर, तेजराम दिवटे, डेलीस ठाकरे, प्रकाश चूटे हे निवडून आले.