मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आदिवासी विध्यार्थीसंघ व अजयभाऊ मित्र परिवार गटाचे समर्पित 18 पैकी 11 जागेवर दणदणीत विजय झालं असून. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांना अशोक रापेल्लीवार, गणेश दुर्गे, मुस्ताक आनंद दहागावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. सदर सत्कार कार्यक्रम अहेरी तालुक्यातील अजयभाऊ कंकडालवार यांच्या स्वगावी इंदाराम निवास्थानी येथे पार पाडले.
यावेळी उपस्थित इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, नरेश गर्गम, लक्ष्मण आत्राम,राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार, प्रकाश दुर्गे सह आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.