नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील कळमेश्वर पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहपा नगर परिषद येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, राजमाता अहिल्याबाई होळकर, संत गाडगे महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे एक मे कामगार दिवस साजरा करण्यात आला त्याच प्रमाणे या कार्यक्रम संगीतमय प्रबोधनांचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता. संविधान मनोहर यांनी कवालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे मी रमाई आंबेडकर बोलतो रमाई नाट्य हा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी तालुक्यातील समाजासाठी चांगले कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील नागरिकांचा नागरी सत्कार करण्यात आला महामानवाच्या संयुक्त जयंती निमित्ताने सांस्कृतिक काम करून समाजाचे रूम फेडणाऱ्या पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला यात महाराष्ट्र संदेश न्युजचे विदर्भ ब्यूरो चीफ युवराज मेश्राम यांचा नागपूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी शाल श्रिफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भीमराव डोंगरे वासुदेवराव उके सुरेश बाबू डोंगरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटील पंजाब चापके यांच्या हस्ते पत्रकार युवराज मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला युवराज मेश्राम यांनी अनेक पत्रकारितेचे काम केले यात तरूनभारत देशोन्नती पुण्यनगरी महासागर अशा अनेक पेपर मध्ये काम केले असून ते निर्भीडपणे काम करतात अन्याय अत्याचाराला वाचा फोडून धावून जातात ते त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आलाय या काटोल तालुका सावनेर तालुका कळमेश्वर तालुका जिल्ह्यातील अनेक ठिकाणी युवराज मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंचकावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटील हर्षवर्धन ढोके सुरेश बाबू डोंगरे वासुदेव ओके नंदाताई देशमुख कृष्णाजी ढोके समशानुद्दीचे मुख्य आणि उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम रंगारी यांनी केले कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.