✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- बाजारात किंवा इतर व्यक्तींद्वारे महाशक्ती आर.आर.,एचटीबीटी किंवा बी.जी.-3 इत्यादी नावाने बियाणे जिल्ह्यामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा नावाने कोणतेही अनधिकृत कंपनीचे किंवा इतर प्रतिनिधीद्वारे मिळणारे बियाणे पेरणीसाठी खरेदी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
असे बियाणे कोणत्याही प्रकारची चाचणी न होता बाजारात आलेले असते. त्यामुळे अशा बियाण्यां पासून शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा अनधिकृत खरेदी केलेल्या बियाण्यांचे कोणतेही बिल किंवा परवाना नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा बोगस बियाण्यांमूळे नुकसान झाल्यास कोणतीही भरपाई शासनामार्फत देण्यात येत नाही.
बियाणे खरेदी करतांना घ्यावयाची काळजी
बियाणे खरेदी करतांना अधिकृत परवाना असणाऱ्या कृषि सेवा केंद्रातून बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पावती, पिशवी, टॅग इत्यादी जपून ठेवावी. पॉकीटावर लॉट नंबर, अंतिम मुदत, उगवणशक्ती इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात. बियाणे पॉकीट योग्य वजनाचे असल्याबाबत खात्री करावी. कोणीही शेतकऱ्यांना असे बोगस बियाणे विक्री करीत असल्यास कृषि विभागाशी संपर्क साधावा. किंवा 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 07152-250099 या दुरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे कृषि विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण यांनी कळविले आहे.