Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर करणारे कर्मचारी व अधिकारी यांना निलंबित करा, वंचित माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनची मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 4, 2023
in उत्तर महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर करणारे कर्मचारी व अधिकारी यांना निलंबित करा, वंचित माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर करत असणारे काही कर्मचारी व अधिकारी यांना निलंबित करा तसेच गेले सहा वर्षांपासून अधिक काळ एकाच ठिकाणी कामगार कार्यालयात ठाण मांडून असणारे अधिकारी व कर्मचारी यांची शासन निर्णयानुसार ताबडतोब बदली करा. संजय कांबळे, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांची मागणी

उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन

सांगली:- ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय कांबळे यांनी, सहाय्यक कामगार आयुक्त, सांगली जिल्हा यांच्या मार्फत, कामगार तथा पालकमंत्री तसेच कामगार प्रधान सचिव मुंबई, कामगार आयुक्त मुंबई, अप्पर कामगार आयुक्त पुणे यांना लेखी निवेदन द्वारे कळविले आहे कि, श्रमिक , कष्टकरी व मोलमजुरी करणारे नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या साठी व त्यांच्या मुलांसाठी मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक विविध कल्याणकारी योजनांचे अनुदान लाभ देण्यात येतो या योजनेमुळे कामगारांच्या मुलांना आपले शिक्षण, कामगारांना हक्काचे घर, वैद्यकीय सुविधा व सामाजिक सुरक्षा अनेक सुख सुविधांचा लाभ मंडळाच्या राखीव निधीतून मिळत आहे. त्या अनुषंगाने बांधकाम कामगारांनी मंडळानी आखून दिलेल्या वेबसाईट वरती जावून रितसर मुळ योग्य ती स्पष्टपणे दिसणारी कागदपत्रे ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर प्रथम दाखल कागदपत्रे तपासणी करणारे मंडळाने नेमणूक केलेले MBOC चे अधिकृत आयडी असणारे काही क्लार्क हे नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी दाखल केलेली कागदपत्रे हे मंडळाच्या आखून दिलेल्या निकषा नुसार सर्व योग्य व सुस्पष्ट दिसून येत असणारे कागदपत्रे हे तपासणी करते वेळी, अशिक्षित बांधकाम कामगारांना केवळ त्रास देण्याचा हेतूने “अस्पष्ट कागदपत्रे ” असे शेरा मारत आहेत व ते अर्ज त्रूटी मध्ये टाकले जात आहेत. तसेच बरेचदा कामगारांना दोनच अपत्य असताना तसेच नोंद असतांना ही तिसरे अपत्य म्हणून शेरा मारला जात आहेत. हे केवळ श्रमिक, कष्टकरी व अशिक्षित बांधकाम कामगारांना विनाकारण त्रास देण्याचा प्रकार सुरू केलेला आहे. तसेच पुढील अधिकारी हे झिरो पेंडन्सी दाखविण्या करीता MBOC चे क्लार्क यांनी टाकलेला रिमार्क जसाचातसा घेऊन पेस्ट करीत चालले आहेत. कामगारांचे दाखल अर्ज त्रूटी मध्ये टाकले जात आहेत बरेचशे अर्ज न पाहताच बाद करीत आहेत, तसेच काही पात्र असणारे अर्ज हे “मूळ कागदपत्रे तपासणी साठी घेऊन यावे” असा अधिकारी शेरा मारत आहेत यामुळे परत मंडळाच्या वेबसाईट वर ऑनलाईन अपडेट करावी लागत आहेत. मंजूर अर्ज असतानाही निष्कारण सर्व कागदपत्रे जशीच्या तशी पूर्तता करावी लागत आहेत. परत पूर्वी प्रमाणे प्रोसेस करावी लागते. त्यामुळे मंजूर अर्जाची आणखी चार ते पाच महिने वाट पाहावी लागत आहे. हि कार्यालयात वस्तुस्थिती आहे. वास्तविक पाहता मंजूर अर्जाची छाननी कागदपत्रे तपासणी करण्यासाठी नोंदणीकृत कामगारांना कार्यालया मार्फत फोन करून कागदपत्रे तपासणी करण्या साठी मूळ कागदपत्रे ठराविक मुदतीत घेऊन येण्यास सांगितले पाहिजे अथवा तसे मंडळाच्या ऑनलाईन वेबसाईट वर वेगळे प्रयोजन असणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या अर्जांची यादी वेगळी होईल व फेरतपासणी साठी सोईस्कर होईल असे नियोजन न करता कोणत्याही धोरणात्मक निकष न लावता काही अधिकारी व कर्मचारी हे विनाकारण अर्ज त्रूटी व रद्द करण्याचा सपाटाच सुरू ठेवले आहे.

या सर्व गोंधळ व मनमानी कारभारामुळे श्रमिक, कष्टकरी व बांधकाम कामगारांना आपले रोजचे काम बुडवून वरचेवर कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यांना काम केल्यावरच रोजची चुल पेटवली जाते, उपजीविकेसाठी नियमितपणे काम करणे आवश्यक आहे.अशा खडतर परिस्थितीत त्यांना वरचेवर कार्यालयात हेलपाटे मारायला लागलत असल्याने त्यांचे मानसिक कुचंबणा व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यामुळे खरा बांधकाम कामगार हा शासन सवलती पासून वंचित राहत आहे. याला कारणीभूत कोण, या ढिसाळ कार्यपद्धतीमुळे बांधकाम कामगार वैतागून गेले आहेत. याचबरोबर काही अधिकारी हे गेले दहा वर्षापूर्वी पासून आपल्या सांगली जिल्हा व आपल्या कामगार सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात तळ ठोकूनच बसले आहेत. वास्तविक पाहता कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी हा जवळ पास सहा वर्षे एकाच जिल्ह्यात व एकाच कार्यालयीत राहू शकत नसताना ही लोक बिनधास्त आपले मनमानी कारभार करत आहेत. त्यांना कार्यालयांतील सर्व बाबींचा अंदाज तसेच विविध प्रकारचे लागेबांधे असण्याची शक्यता नाकारता येत नसते, यामुळे आपण सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास करून जबाबदार असणारे, सुखावलेले अधिकारी व कर्मचारी यांनी आजतागायत केलेल्या कामाची कार्यालयीन चौकशी करून दोषींवर निलंबित करण्याची कठोर कारवाई करून तसेच श्रमिक,कष्टकरी बांधकाम कामगारांचा व त्यांच्या कुटुंबीयांच्या शुभेच्छा घ्याव्यात.

अन्यथा आम्हाला ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या मार्फत, शोषित श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल याची प्रामुख्याने नोंद घ्यावी. होण्याऱ्या नुकसानीला महाराष्ट्र शासन तसेच जिल्हा प्रशासन जबाबदार राहणार आहे असाही इशारा देण्यात आला.

या प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे आवर्जून उपस्थित राहून सहभाग घेतला, जिल्हा महासचिव अनिल मोरे, उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, तासगाव शहर अध्यक्ष शिवाजी गुळवे, तासगाव शहर उपाध्यक्ष सचिन साळुंखे, रोशन जावळे, निकिता कडिसर, विक्रांत सादरे, शिवकुमार वाली, सदिप कांबळे, मऱ्याप्पा राजरतन, चंद्रकांत कांबळे, इसाक सुतार,असलम मुल्ला, जावेद अलाशी, सुभाष पाटील, विठ्ठल जाधव, बंदेनवाज राजरतन यांच्या बरोबर बहुसंख्येने कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

वर्धा: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’चे उद्घाटन मोफत तपासणी, औषधोपचार.

Next Post

विठ्ठल ठोंबरे पाटील JP News मराठी तर्फे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विठ्ठल ठोंबरे पाटील JP News मराठी तर्फे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

विठ्ठल ठोंबरे पाटील JP News मराठी तर्फे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In