डॅनियल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी, ता. ५:- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदाचा भार स्वीकारल्यानंतर पोलिस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी आज शुक्रवारी (ता.५) रोजी नागरिकांशी थेट संवाद साधला. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या अडचणी जाणून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. पोलीस आयुक्तांनी आधुनिक तंत्रज्ञान (@CP-PCCity) या ट्विटर माध्यमाचा वापर करून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याशी थेट संवाद साधता आल्याने नागरिकांचे मनोबल उंचावले आहे.
शहरातील मुख्यतः वाहतूक कोंडी, वाढता सायबर क्राईम, गुन्हेगारी अशा नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सविस्तर उत्तर दिले. कोयता गॅंग आणि गुन्हेगारी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे म्हणाले की, मागील चार महिन्यापासून एकूण ५९ शस्त्रे व २७६ कोयते जप्त करण्यात आले आहेत. तसेच १३५ कुख्यात गुंडांवर मोका व एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. भविष्यात यापुढे देखील अशाप्रकारे कारवाई केली जाणार आहे. वाढत्या सायबर क्राईम बाबत देखील आयुकतानी स्पष्ट भूमिका मांडली. तसेच हिंजवडी भागात नागरिकांना भेडसवणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. विरुद्ध दिशेने येणाऱ्या मागील काही महिन्यांमध्ये ०३हजार चालकांवर कारवाई, बुलेट फटाके उडवणाऱ्या ३५९ पेक्षा अधिक जणांना कारवाई करून सायलेन्सर जप्त केले असल्याचे देखील पोलीस आयुक्तांना सांगितले. याशिवाय गेली कित्येक वर्ष चाकण रहिवाशांना भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न योग्य नियोजनामुळे कसा सुटला आहे याबाबत संबंधित अधिकारी यांचे पोलीस आयुक्त विनय यांनी कौतुक केले.
या उपक्रमामध्ये शहरातील २५० पेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते. तर ३८० पेक्षा अधिक नागरिकांनी ट्विट केले. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी नागरिकांशी संवाद साधल्यानंतर काही जणांनी पोलीस आयुक्ताना आठवड्याला आमच्याशी अशा प्रकारे संवाद साधावा अशी मागणी केली. मात्र आपण ट्विट माध्यमातून किंवा नियंत्रण कक्ष या द्वारे संपर्क करावा असे पोलीस आयुक्तांनी सुचवले.

