मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- प्रतिष्ठित नागरिक रमजान खान यांच्या मुलीचा शेख बाबर जमाल मोहम्मद शेख यांच्या मुलासोबत 7 मे रोजी नीकाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर यांनी आपली उपस्थिती दर्शवली.
स्थानिक राज राजेश्वर फंक्शन हॉल येथे संपन्न झालेल्या निकाह सोहळ्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर यांनी उपस्थित राहून वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बबलू भैय्या हकीम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348