उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- रविवार दिनांक ०७ मे रोजी डॉ. नितिन गोंधळे यांना फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील प्रामाणिक कार्याची दखल घेऊन तामिळनाडू येथील चेन्नई मद्रास विद्यापीठातर्फे डॉक्टरेट डीलीट पदवी मिळाल्या बदल रोहीदास नगर येथील रोहीदास समाज यांच्या वतीने येथील मित्रमंडळाने आयोजित केलेल्या जयंती महापुरुषांच्या या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला आहे.
डॉ. नितिन गोंधळे हे मागील अनेक वर्षांपासून फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीत कार्य करत आहे. यावर्षी त्यांनी अपार कष्ट करून चेन्नई मद्रास विद्यापीठातर्फे डॉक्टरेट डीलीट पदवी मिळवली. यांच्या या कार्याची दखल रोहीदास समाजाच्या वतीने घेण्यात आली. त्यामुळे महापुरुषाच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.