✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- वर्धा जिल्हातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आर्विकर सरसावले आहे. त्यामुळे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालया साठी हिंगणघाट आणि आर्वी हे आमने सामने येणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालया साठी आता दोन्ही तालुके आंदोलन जोर धरत आहे. त्यामुळे कुणाच्या आंदोलनाला यश येते हे दिसून येणार आहे.
राज्य शासनाने वर्धा येथे रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले. त्यासाठी वर्धेलागत सातोडा येथे जागाही निश्चित केली. मात्र, हे महाविद्यालय हिंगणघाट येथेच व्हावे म्हणून आंदोलन सुरू झाले. आधीच दोन महाविद्यालये सुरू असल्याने वर्धेत तिसरे महाविद्यालय कशाला, असा युक्तिवाद करीत हिंगणघाट बंद पाळण्यात आला. आता आर्वीकरांनीही या महाविद्यालयाची मागणी करीत रेटा देणे सुरू केले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर तळेगाव येथे जागा उपलब्ध असून आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील नागरिकांना त्याचा लाभ होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी निवेदन देत स्पष्ट केले. सेवाग्राम व सावंगी रुग्णालय हे सत्तर किलोमीटर दूर अंतरावर असल्याने या भागातील रुग्णांना तेथील वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच महामार्गावर नित्य अपघात होतात. या अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळू शकत नाही. म्हणून आर्वी हे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी योग्य ठिकाण असल्याचा दावा झाला.

