सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्हातील कोरपना तालुक्यातील तेलंगाना सीमेजवळील एका गावातील विवाहित महिलेवर नवऱ्याच्या नातेसंबंधातील चुलत मामे भावाकडून तिच्याशी जबरदस्ती करत बदनामीची धमकी देत लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार कोरपना पोलीसात बुधवारी दाखल करण्यात आली.
पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या घराशेजारी राहणाऱ्या नवऱ्याचा चुलत मामे भाऊ याने पिडीतेला एका महिन्यापासून छेडछाडी करून तिला बदनामीची धमकी देत होता. 20 एप्रिल रोजी पिडीत विवाहित महिला घरी एकटी असताना त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पुन्हा दोनदा धमकी देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 10,0मे ला हात धरून बकऱ्या चरायला चल म्हणून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याला कंटाळून पीडित महिलेने कोरपना पोलीस स्टेशन गाठून बुधवारी तक्रार दाखल केली. या प्रकरणी शुभम तलांडे वय 22 वर्ष याला अटक करण्यात आली आहे.
विवाहित महिलेवर अत्याचार प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 376, (2) एन, 354, 417, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर खेकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी संजय शुक्ला व कोरपना पोलीस करीत आहे.