युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक दिवंगत डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन पूर्व नागपूर चे सामाजिक कार्यकर्ते इंजी.गौतम पाटील यांची पूर्व नागपूर परीसरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा असावी अशी मागणी होती. त्यासाठी त्यांनी महा.अंनिस च्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यांशी संपर्क साधला व काल त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेथील प्रतिष्ठीत लोकांना एकत्रित केले व महा. अंनिस ची पूर्व नागपूर शाखेची स्थापना केली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखेची निवासी प्रांगणात संपन्न झालेल्या या सभेचे अध्यक्ष राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे हे होते. तर मंचकावर चित्तरंजन चौरे ,कार्याध्यक्ष, देवानंद बडगे कार्याध्यक्ष उत्तर नागपूर, चंद्रशेखर मेश्राम, लेखापाल व डॉ सुनील भगत हे उपस्थित होते. केन्द्रीय निरिक्षक म्हणून देवयानी भगत दक्षिण नागपुर व राज्य कार्यकारिणी सदस्या विजया श्रीखंडे उपस्थित होत्या.
या सभेची शुरुवात भारतीय संविधानाच्या सामुदायिक उद्धेशीका वाचनाने झाली व तद्नंतर नविन कार्यकारिणी निवडण्याची प्रक्रिया आरंभ झाली. यावेळी उपस्थित सर्व सभासदांनी सर्वानुमते व एकमताने अध्यक्ष म्हणून समाज सेवक कमलाकर मेश्राम यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष- शोभाताई पाटील, कार्याध्यक्ष – सतीस उके, प्रधान सचिव – देवेंद्र लांजेवार, विविध उपक्रम विभाग, अनिल थुल, बुवाबाजी संघर् -आकाश कांबळे, जात निर्मूलन -स्मिता वंजारी, वैज्ञानिक जाणिवा -पक्षभान ढोके, महिला विभाग -माया सुखदेवे, मानसिक आरोग्य -डाॅ.ज्योती धारगावें व मंगेश राजगीरे, युवा वाहिणी -स्वपनिल तिरपुडे, सोसल मिडिया -अविनाश सुखदेवे वार्तापत्र, सांस्कृतिक विभाग -संघदिप रंगारी यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाची प्रस्तावना इंजी गौतम पाटील यांनी प्रस्तुत केली. सुत्र संचालन जिल्ह कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे यांनी तर आभार चंद्रशेखर मेश्राम यांनी मानले. या प्रसंगी ‘ज्योतीबा का संघर्ष ह्या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. राॅकी घुटके, वर्षा सहारे, अजय रहाटे, सुषमा शेवाळे, देवानंद बडगे, चंद्रशेखर मेश्राम यांनी भूमिका साकार केल्या. ही नवनियुक्त कार्यकारिणी उच्चविद्याविभूषित बुद्धीजीवी व चळवळीतील महिला कार्यकर्त्यांनी सज्ज अस महाअंनिस ची चळवळ अधिक जोमाने विवेकी करतील यात शंका नाही. यशस्वीतेसाठी प्रतिभा कांबळे, मनू मानवटकर, वंद चंदनखेडे, अपेक्षा कांबळे, उद्धव कांवळे, विभा कावळे, सोनाताई व सर्व शाखांचे पदाधिकारीव जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348