शैलेश ओव्हाळ, पिपंरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील प्रभाग क्रमांक ९ येरवडा धर्मवीर संभाजी महाराज उड्डाणपूल गुंजन या मार्गाने जाणारे सर्व बसेस खालून न जाता उड्डाणपूल वरून जात आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. वेळेवर वाहन न मिळाल्याने त्रास सहन करावा लागत आहे.
धर्मवीर संभाजी महाराज उड्डाणपूल गुंजन या मार्गाने जाणाऱ्या पीएमपीएमएल च्या बसेस नागरिकांना अलीकडेच उतरवून त्या सर्व बसेस खालून न जाता भरदाव वेगाने उड्डाणपूल वरून जात आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाचा लाभ मिळत नाही आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे त्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. परिसरातील नागरिकांना होत असलेला त्रास बघता शिवसेनेकडून याची दखल घेण्यात आली. लवकरात लवकर पीएमपीएमएल खात्याने याची दखल घेऊन सर्व बसेस या रोज खालूनच जाण्यात याव्या अन्यथा प्रभाग येरवडा शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी शिवसेना प्रभाग क्रमांक ९ यांनी पीएमपीएमएल खात्याला ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. यावर लवकर तोडगा नाही निघाला तर आम्हाला पीएमपीएमएल आंदोलने करावी लागेल यांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असेही यावेळी सुहास फुलचंद कांबळे शिवसेना प्रभाग प्रमुख येरवडा यांच्या कडून सगण्यात आले.