माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांची सहउदघाटक म्हणून उपस्थिती.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चामोर्शी:- तालुक्यातील रामाळा गावात छत्रपती संभाजी महाराज दिनी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते छत्रपती महाराज यांच्या अश्वारुळ पूर्णाकृती पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात व उत्साहात अनावरण सोहळा पार पडला.
यावेळी युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, गडचिरोली मतदार संघाचे आमदार डॉ.देवराव होळी, प्रदेश सदस्य स्वप्नील वरगंटे, माजी सभापती रमेश बारसागडे,जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शाह, भाजप अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजपा अध्यक्ष दिलीप चलाख, सरपंच अरुण देवतळे, उपसरपंच रवी पाल आदी मंचावर उपस्थित होते.