मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शिवणकाम करण्याचा व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या शिक्षक पतीने आपल्या घराच्या ‘चेजिंग रुम’ला होल पाडून कपडे बदलणाऱ्या महिलांचे चित्रीकरण केल्याचा आरोप एका महिलेने केला. त्यामुळे देसाईगंज शहरात एकच खळबळ माजली आहे. हा संतापजनक प्रकार देसाईगंज येथे 15 मे रोजी उघडकीस आला. महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद दाखल करून आरोपी शिक्षकास बेड्या ठोकल्या आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नंदकिशोर भाऊराव धोटे वय 45 वर्ष, रा. कुरखेडा, ह.मु. देसाईगंज असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तो कुरखेडा तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहे. देसाईगंज येथे स्वत:च्या घरी त्याची पत्नी शिवणकाम करण्याचा व्यवसाय करते. त्यामुळे पत्नीकडे महिलांची नेहमी ये जा असते. त्यांनी घरीच कपडे बदलण्यासाठी छोटी खोली तयार केलेली आहे. या खोलीच्या भिंतीला होल पाडून नंदकिशोर धोटे हा मोबाईलद्वारे महिलांचे कपडे बदलतानाचे चित्रीकरण करत असे. यासंदर्भात एका महिलेच्या लक्षात येताच तिने देसाईगंज ठाणे गाठून फिर्याद दिली, त्यानंतर नंदकिशोर धोटेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

