संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून मेडिकल रुग्णालयातून एक खळबजनक घटना समोर आली आहे. सोमवारी एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचा संतप्त नातेवाईकांनी संबंधित विभागात असलेल्या तीन निवासी डॉक्टरांना मारहाण केली. त्यामुळे काही काळ रुग्णालयात खळबळ माजली होती. निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणीनंतर मेडिकलमधील डॉक्टरांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागपुर शहरातील अजनी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. डॉक्टरांना मारहाण प्रकरणी डॉक्टर असोसिएशन (मर्डने) आंदोलनाचा इशारा दिला. मेडिकल रुग्णालयातील अधिष्ठात्याशी केलेल्या चर्चेनंतर हे प्रकरण शांत झाले.
काय आहे प्रकरण…
नागपुर शहरातील शताब्दी चौक परिसरात राहणारे कल्पेश यादव वय 37 वर्ष असे मृताचे नाव आहे. पोटाचा गंभीर आजार असल्याने डॉक्टरांनी सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला. त्याची प्रकृती खालावल्याने आयसीयूत दाखल करण्यास सांगितले मात्र दरम्यान मृत्यू झाल्याने डॉक्टरांवर हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी निवासी डॉक्टर सुषमा महाले ,डॉक्टर प्राची अग्रवाल, डॉक्टर राहुल अग्रवाल आणि एक पॅरामेडिकल विद्यार्थी या सर्वांना मारहाण केली त्यामुळे रेडिओलॉजी विभागात तणावाचे वातावरण होते. सुरक्षारक्षकांनी तीन कुटुंबीयांना पकडले तर एक जण फरार झाला. घटनेनंतर मेडिकलचे वातावरण तापले अधिष्ठाता डॉक्टर राज गजभिये यांनी सुरक्षारक्षकांची बैठक बोलावून खडे बोल सुनावले.