Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन, सिंदी (मेघे) येथील झोपडपट्टी हटवून होणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रास समता सैनिक दलाचा विरोध.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 23, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन, सिंदी (मेघे) येथील झोपडपट्टी हटवून होणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रास समता सैनिक दलाचा विरोध.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप,वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा. न. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आज अचानक सिंदी मेघे येथील रहवासी महिलांनी आपल्या मागण्या साठी वर्धा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर ठीया आंदोलन केले, यामुळे काही वेळ प्रशासनात एकच खळबळ माजली होती. नियम बाह्यरित्या बेघर करण्याची प्रक्रिया थांबविण्या बाबतचे निवेदन समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटच्या वतीने जिल्हाधिकारी वर्धा यांना सोमवार दि.22 मे 2023 ला सादर करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही मौजा सिंधी (मेघे ) येथील सर्वे.158/1 या भूखंडावर 5 वर्षांपासून झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहोत. दि. 23/08/2017 रोजी तत्कालीन सरपंच श्रीमती सुप्रिया श्याम मोहोड यांनी ग्रा. पं. मध्ये ठराव घेऊन ती जागा राहिवाश्याना कायम करण्याबाबत जाहीर केले होते. तेव्हा पासून आम्हाला शासनाकडुन कोणताही त्रास झाला नाही आणि आम्ही सुखेनैव या ठिकाणी राहत होतो. अचानक आम्हाला समजले आहे की. आम्ही राहत असलेल्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे .वास्तविक पाहता भारतीय संविधाना नुसार या देशात राहणाऱ्या कोणत्या ही नागरिकाला निवसापासून वंचित करण्यात येत नाही. मात्र आम्ही इतके वर्षांपासून या ठिकाणी राहत आहोत. सिंदी (मेघे) येथे अनेक ठिकाणी मोकळी जागा असताना नेमके याच ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्या मागे राजकीय खेळी असल्याच दिसून येत आहे. ग्राम पंचायत सिंदी (मेघे) यांनी आम्ही झोपडपट्टीधारक निवासी यांना सदर जागा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी राखीव करण्यात आली असल्यामुळे आपण त्वरित खाली करावी अशी सूचना देण्यात आली आहे. यामध्ये मोठी राजकीय खेळी झालेली असून राजकीय सूडापोटी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यात माजी जि प. सदस्य आणि प्रामुख्याने ग्रा. पं. चे ग्राम विकास अधिकारी यांना प्रामुख्याने समावेश आहे. राजकीय दबावाखाली हे संपूर्ण प्रकरण रंगवीन्यात येत आहे. त्यामुळे आपण या प्रकरणात प्रधान्याने लक्ष घालून सर्व प्रकरणाची चॊकशी करावी आणि शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही करावी.

प्राथमिक आरोग्य केंद्र ही नागरिकांची मूलभूत गरज असल्यामुळे त्याचा आम्हाला विरोध नाही. मात्र या परिसरात खूप जागा उपलब्ध असल्यामुळे त्यासाठी स्वतंत्र जागेचीव्यवस्था करावी आणि आम्हाला बेघर करु नये हीच विंनती यापूर्वी विधमान तहसीलदार रमेश कोळपे यांनी चर्चेमध्ये सदर केसचा निकाल दीड महिन्यामध्ये लावून झोपडपट्टी वासियांना न्याय मिळण्यात यावा अशा सूचना स्थानिक ग्रामपंचायत व जिल्हा परिषद पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या मात्र त्यावर कोणतीही कारवाही कोणत्या ही पदाधिकाऱ्यांनी केली नाही आणि तहसीलदार याच्या आदेशाची अवहेलना होऊनही त्यांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नाही यात ते किती कर्तव्यदक्ष आहेत हे सिद्ध होते. यांची सुद्धा चॊकशी करण्यात यावी आणि आम्हा झोपडपट्टी वासियांना न्याय मिळवून द्यावा असे निवेदनात नमूद आहे.

यावेळी निवेदन देताना जिल्हा संघटक अभय कुंभारे, प्रदीप कांबळे, पप्पू पाटील, चंदू भगत, रोशन कांबळे, प्रिती आष्टेकर, प्रिती सिगणापुरे, सुमन मरस्कोल्हे, चंदा पाखले, शांताबाई इंगोले कोमल थापरडे, सोनाबाई दूधकोवे, साधना चव्हाण, दीपा घाटे, लक्ष्मी डोगरे, पूजा खैरे, जया शेंडे, सविता कुमरे, यशोधा इरपाते, लीला वाटगुले, वर्षा धुर्वे, बेबी मसराम, जयश्री कुंभारे, रंजना शेळके, जोसना कुंभारे, जोती पाटील, वदंना वासनिक, वंदना फुलझेले, सुमन फुलझेले, वनिता नरड, मीना रामटेके, सुषमा मरापे,विद्या कोवे, लक्ष्मी मसराम, नलू इरपाते, जया चैधरी, अंजु भेंडारे, चंदा देशमुख, दीपाली पुडके, निर्मला जानराव शेंडे लीलाबाई सिरसाम, रत्नमाला रामटेके, मुन्नी मेश्राम, जया उईके अश्विनी गजभिये, आशा वाळके, सायली वासनिक, शरद चौधरी, दीपक वासनिक आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व बहुसंख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Previous Post

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या मागणीला यश, अखेर सांगलीला मिळाला पूर्ण वेळ सहाय्यक कामगार आयुक्त.

Next Post

बीड येथील वादग्रस्त मुंडेंची बदली रद्द, महाराष्ट्र संदेश न्युज’च्या वृत्तामुळे शासनाचा निर्णय.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बीड येथील वादग्रस्त मुंडेंची बदली रद्द, महाराष्ट्र संदेश न्युज’च्या वृत्तामुळे शासनाचा निर्णय.

बीड येथील वादग्रस्त मुंडेंची बदली रद्द, महाराष्ट्र संदेश न्युज’च्या वृत्तामुळे शासनाचा निर्णय.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In