रांका प्रदेश सरचिटणीस अतुल वादीले यांचा इशारा..
मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट रेल्वे स्थानकावर कोरोनाच्या आधी सुरू असलेले रेल्वेचे थांबे येत्या आठ दिवसात पूर्ववत सुरू न झाल्यास 1 जून ला हिंगणघाट स्थानकावरून जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या हिंगणघाट स्थानकावर अडविण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे सरचिटणीस अतुल वांदिले यांनी एका निवेदनातून प्रशासनाला दिलेला आहे.
हिंगणघाट रेल्वे स्थानकावर कोरोनाच्या आधी अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे होते.परंतु कोरोनाच्या महामारीने देशभरातील सर्वच थांबे बंद करण्यात आले होते. कोरोनाचा काळ संपल्यावर सर्व रेल्वे स्थानकावरील रेल्वे थांबे पूर्ववत सुरू झाले मात्र हिंगणघाट रेल्वे स्थानकावरील अनेक सुपरफास्ट गाड्यांचे थांबे मात्र वारंवार निवेदन देऊन, विंनती करूनही अजूनही पूर्ववत करण्यात आलेले नाही.
अतुल वांदिले यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणघाट रेल्वे स्थानकावर कोरोनाच्या आधी ज्या रेल्वे गाड्यांचे थांबे नियमित होते ते पुन्हा पूर्ववत करण्यात यावे ह्या मागणी बाबत आपण अनेकदा रेल्वे मंत्र्यापासून तर जिल्ह्याच्या खासदारांना निवेदन देण्यात आले परंतु मागील दोन वर्षांपासून केवळ आश्वासनाशिवाय हिंगणघाट करांच्या पदरी काहीच मिळालेले नसल्याची खंत अतुल वांदिले यांनी व्यक्त केली आहे.
आता हिंगणघाटकरांची सहनशीलता संपत आलेली असून वारंवार निवेदन देऊन व दिल्ली येथे प्रत्यक्ष रेल्वे अधिकारी वर्गाशी भेट देऊनही रेल्वेचे अधिकारी जाणीवपूर्वक हिंगणघाटकरांच्या भावनेशी खेळ खेळण्यात येत आहे.आता रेल्वे प्रशासनाला जागे करण्यासाठी 1 जूनला या मार्गाने जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या अडविण्याची घोषणा रा का नेते अतुल वांदीले यांनीं केलेली आहे.

