मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील राजाराम (खां) येथील श्री बाबुराव कंबगोनीवार यांचे कनिष्ठ चिरंजीव रोशन कंबगोनीवार यांचा तेलंगाणा राज्यातील जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील महामुत्तापूर येथील सत्यम गौड कोडूरी यांच्या कनिष्ठ कन्या हेमाश्री उर्फ मनीषा हिच्याशी 21 मे रोजी तेलंगाणा राज्यात विवाह सोहळा संपन्न झाला.
23 मे रोजी राजाराम येथे स्वागत समारंभ व स्वरूची भोज कार्यक्रम करण्यात आले.या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी उपस्थित राहून रोशन आणि हेमाश्री या नवदांपत्याला शुभ आशीर्वाद दिले. यावेळी राजाराम येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.