पल्लवी मेश्राम, नागपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना खासदार व संपर्क नेते कुपाल तुमाने, विदर्भ नेते किरण पांडव व शिवसेना महाराष्ट्र राज्य विस्तारक हितेश यादव यांच्या मार्गदर्शन मध्ये युवा सेना जिल्हा प्रमुख नीलेश तिघरे यांच्या उपस्थिती आणि नागपुर शहर प्रमुख सचिन यादव यांच्या आदेशा नुसार दि. 22 मे सोमवार ला खेमचंद्र कैथेले उपशहर प्रमुख उत्तर नागपुर यांचा नेतृत्वात वीज महावितरणाचे मुख्य अभियंता दिलीप दोड़के यांना वीज महावितरण यांची बंद पडलेली योजना वसंतराव देशमुख अभय योजना ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभय योजना या नावाने सुरू केली आहे. याचबरोबर ग्राहकाच्या वीज मीटर कनेक्शन कट करण्याची मुहिम बंद करून, वीज ग्राहकाचे कट करण्यात आलेले वीज मीटर बिलाचे हप्ते पाडून ते मीटर सुरू करण्यात यावे आणि नागरिकांच्या विविध समस्याला घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी या समस्याचे लवकऱ्यात लवकर निवारण करून नागरिकाचे प्रश्न सोडवण्याचा आग्रह करण्यात आला.
निवेदन देते वेळेस नीलेश जाधव उपशहर प्रमुख पूर्व नागपुर, अभिषेक वनवे उपविभाग प्रमुख उत्तर नागपुर, तरुण वासनिक, प्रशांत कांबले सह अनेक कार्यकर्ता आदि उपस्थित होते.

