ईसा तडवी जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- महाराष्ट्रात लाचखोरीचा भस्मासुर मोठा प्रमाणात वाढत आहे. त्यात अजून एक घटना जळगाव जिल्ह्यातून समोर येत आहे. येथे एका अधिकाऱ्याला लाच घेतल्या प्रकरणी बेड्या ठोकन्यात आल्या आहे.
भोजन पुरवठादाराचे देयक मंजूर झाल्यानंतर ते देण्यास टाळाटाळ करून त्यासाठी 20 हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील लेखाधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात करण्यात आली.
तक्रारदारांनी पत्नीच्या नावे असलेल्या मे. सप्तश्रृंगी माता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या दहिवद, ता. अमळनेर, जि. जळगाव नावाने चोपडा येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाला (नवीन) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात लागणारा दैनंदिन भोजनाचा ठेका घेतलेला होता. त्यांनी वर्षभर वसतिगृहास पुरविलेल्या भोजन ठेक्याचा मोबदला म्हणून पत्नीच्या नावे असलेल्या संस्थेच्या बँक खात्यात 76 लाख रुपये डिमांड ड्राफ्टद्वारे देण्यात आले आहेत. या बदल्यात तक्रारदारांकडे एकूण रकमेच्या अर्धा टक्का याप्रमाणे प्रथम 36 हजार 500 रुपये आणि नंतर तडजोडीअंती 20 हजार रुपयांची मागणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील लेखाधिकारी रवींद्र जोशी वय 57 वर्ष, नेहरुनगर, मोहाडी रोड, जळगाव याने केली. याबाबतची तक्रार जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.
तक्रारीची पडताळणीसाठी पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी पथक नियुक्त करीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सापळा रचला. मागणी केलेली लाच स्वतःच्या कक्षात स्वीकारताना जोशी यास रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी यावल येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348-7385445348