संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात आता बाल गुन्हेगारीची संख्या पण कमी नाही. एशाच एका घटनेत नागपुर शहरातील इमामवाडा पोलिसांनी तीन बाल गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे.
नागपूर शहरातील गणेश पेठ बस स्टॉप परिसरातील बैद्यनाथ चौकातील ट्रॅव्हल्स कार्यालयासमोर बाहेरगावावरून आलेल्या एका प्रवाशाचा 15750 रुपयांचा मुद्देमालाची तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांनी मिळून चोरी केली. इमामवाडा पोलिसांनी या गुन्हाचा तपास करत 12 तासात या बाल गुन्हेगारांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला आहे.प्राप्त माहितीनुसार विठ्ठल प्रमेश्वर वय 30 वर्ष रा. ढेकन मोहा, जि. बीड हे शनिवारी पहाटे 4.10 वाजताच्या सुमारास बसने नागपूरला आले. ते बैद्यनाथ चौकातील कमला ट्रॅव्हल्स ऑफिससमोर थांबले होते. तेवढ्यात ऑटोतून आलेल्या तीघांनी त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या जवळील मोबाईल व खिशातील 750 रुपये असा एकुण 15750 रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला.
इमामवाडा पोलिसांनी प्रमेश्वर यांच्या तक्रारीवरून कलम 394, 34 नुसार गुन्हा दाखल केला होता.दरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपास करून ऑटोच्या क्रमांकावरून रामबाग परिसरात राहणाऱ्या तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. या बालकांनी गुन्ह्याची कबुली देऊन मुद्देमाल काढून दिला. इमामवाडा पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून विधीसंघर्षग्रस्त बालकांना पाटनकर चौकातील बाल सुधारगृहात दाखल केले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन उईके, गणेश गुगुळकर, भगवती ठाकुर, सुशील रेवतकर यांनी केली.