पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794636
दत्तवाडी पोलीस व गुन्हेशाखा यूनिट ३
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. २७/०५/२०२३ रोजी दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीत इसम नामे सुनिल विठ्ठल मोरे, वय ५२, रा. लेन नं ३०, जनता वसाहत, पुणे याचा पहाटे कोणतरी अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालुन खुन केलेबाबत दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १४१ / २०२३ भादवि ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल होता. दाखल गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयराम पायगुडे तसेच गुन्हे शाखा युनिट ३ चे प्रभारी श्री. श्रीहरी बहिरट यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दत्तवाडी पोलीस स्टेशन तपास पथक व गुन्हे शाखेची पथके तयार करुन आरोपींचा शोध घेण्यास सुरवात केली. गुन्हे शाखेने केलेले तांत्रिक विश्लेषन, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे हद्दीतील बातमीदार यांचा व्यवस्थित मेळ घालून आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली. त्यांनतर स्थानिक घटनास्थळी उपस्थित असलेला आरोपी नामे समीर ऊर्फ विरेद्र पाडुरंग चौरे, वय ३३ वर्षे, रा. ५२ चाळ निलायम पुलाजवळ पर्वती पायथा पुणे यास दि. २६/०५/२०२३ रोजी अटक करण्यात आले आहे. तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार दुसरा आरोपी नामे राज चंद्रकांत जाधव, वय १९ वर्षे रा. गल्ली नं.०३ मधला टप्पा, जनता वसाहत आनंद मठाजवळ पर्वती पायथा पुणे व एक विधी संघर्षित बालकास काल दि. २७/०५/२०२३ रोजी जनता वसाहात परिसरातुन त्याने गुन्हयात वापरलेल्या दुचाकी गाडीसह त्याब्यात घेण्यात आले असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिल्याने त्यातील राज जाधव यास अटक करण्यात आली आहे व विधी संघर्षितास चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपी नामे राज जाधव याचा गुन्हेगारी पुर्व इतिहास नसुन तो पहाटे पेपरचे गठ्ठे बांधायचे कामे करतो. तो व विधीसंघर्षित आरोपी व मयत इसम हे एकाच परिसारात राहण्यास असुन एकाच अरुंद रस्त्याने जाताना एकमेकांचा धक्का लागल्याने झालेल्या शिवीगाळ व बाचाबाचीमुळे आरोपींने चिडुन जाऊन त्याच्या डोक्यात दगड घालुन खुन केल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने गुन्हयात वापरलेल्या अॅक्टीवा गाडीवर लिहलेल्या “जयशंकर” नावावरुन आरोपींपर्यंत पोलीस पोहचले. गुन्हयात वापरलेल्या अॅक्टीवा गाडी प्रमाणे दिसणा-या पन्नास ते साठ दुचाकी व त्यांच्या मालकांचा यादरम्यान पोलीसांनी शोध घेतला व मुख्य आरोपी शोधुन काढला. गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जयराम पायगुडे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, मा. प्रविण कुमार पाटिल साो, पोलीस उप-आयुक्त सो मा. आर राजा सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग राजेंद्र गंलाडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री. श्रीहरी बहिरट व पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील व गुन्हे शाखेतील पोलीस उप-निरीक्षक चंद्रकांत कामठे, पो.हवा. संतोष क्षीरसागर, कुंदन शिंदे, पो अं पुरुषोत्तम गुन्ला, ज्ञानेश्वर चित्ते, किशोर वळे, प्रशांत शिंदे, प्रमोद भोसले, दयानंद तेलंगे पाटील, अमित सुर्वे, अनिस तांबोळी, सद्दाम शेख, नवनाथ भोसले, अमोल दबडे, अमित चिव्हे, यांनी केली आहे.