पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
अंमली पदार्थ विरोधी पथक-2 पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज दि.२९/०५/२०२३ रोजी आम्ही व अंमली पदार्थ विरोधी पथक-2 चे स्टाफसह बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश माढरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली दोन इसम पुणे रेल्वे स्टेशनचे ताडीवाला रोड,रेल्वे गेट समोर सार्वजनिक रोडवर पुणे येथे गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता आम्ही स्वतः व अमली पदार्थ विरोधी दोन पथकातील स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता इसम नामे 1) शशिकांत चांगदेव नलावडे वय २९ वर्षे, राहणार- मु.पो.धनगरवाडी,कोडोली, सातारा 2)प्रतीक युवराज ओहोळ वय १९वर्षे, राहणार – मुक्काम पो. सालसे,ता.करमाळा, सोलापूर याच्या ताब्यात एकूण किंमत रुपये १६,३५,१००/- किमतीचा ८१ किलो ७५५ ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ व २०,०००/रु की चे दोन मोबाईल फ़ोन, व ३,०००/- की च्या चार बॅग रोख रक्कम ₹११५०/-असा एकूण १६,५९,२५०/- रु चा असा ऐवज जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अक्ट कलम ८(क) २०(ब) (i i) (क), 29 प्रमाणे गुन्हा नोंद करीत आहोत.
यातील आरोपी क्रं.१ हा समर्थ पो स्टे गू.र.नं.१५/२०२३ NDPS ह्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे.
सदरची कामगिरी श्री. रामनाथ पोकळे सो, मा.अपर पोलिस आयुक्त गुन्हे, श्री. अमोल झेंडे सो, मा.पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्री. सतीश गोवेकर सो, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, PSI नरके,ASI घुले, पोलीस अमलदार योगेश मांढरे, संतोष देशपांडे, चेतन गायकवाड,प्रशांत बोमदांडी, संदीप जाधव, मयूर सूर्यवंशी.महेश साळुंखे, साहिलसय्यद शेख, संदीप शेळके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, अझीम शेख,दिनेश बस्तेवाड यांनी केली आहे…