पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. २६/०५/२०२३ रोजी चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे पोलीस नाईक शिवाजी घांडे, पोलीस अंमलदार श्रीकांत कोद्रे यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे अभिषेक दत्तु राठोड हा रिव्हर डील सोसायटीचे समोर रिव्हरडेल रोड खराडी पुणे येथे येणार असून त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आहे अशी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळालेने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक श्री दिलीप पालवे, पोलीस हवालदार १९५१ संकपाळ, पोहवा ३५३८ रणदिवे पोना ७३२९ धांडे, पोना ६६१५ नाणेकर, पोलीस अमलदार ८५६३ हंडगर, पोलीस अंमलदार ३९३३ जाधव, पोलीस अंमलदार ४३५२ कोद्रे असे रिव्हर डेल सोसायटीचे समोर रिव्हरडेल रोड खराडी पुणे येथे परिसरात सापळा रघुन इसम नामे अभिषेक दत्तु राठोड, वय २१, रा. दत्त मंदीर शेजारी हरिश राऊत यांचे घरी भाडयाने वडगाव शेरी, मुळ रा. मु.पो. काळवटी तांडा, पोस्ट बेलडा, ता. आंबेजोगाई जि बीड यास पकडुन त्याचेकडुन १०,०००/- किं. रु. एक गावठी बनावटीचे पिस्टल जप्त करून अधिक तपास केला असता. आरोपीने सांगितले की, येरवडा येथील पापा राठोड व वाल्हेकर यांच्या मर्डरचा बदला घेयचा असल्याने मी व माझे साथीदार शुभम सोनवणे व रोहन चव्हाण असे मिळुन कट रचुन इंदौर मध्यप्रदेश येथुन पिस्टल विकत घेतले होते.
सदरची कामगिरी ही मा. शशीकांत बोराटे, पोलीस उपआयुक्त सो परीमंडळ-४ पुणे शहर, मा. किशोर जाधव, सहा पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर, मा. राजेंद्र लांडगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, मा. जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सो, चंदननगर पो.स्टे. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी दिलीप पालवे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, राम गुरव, सचिन रणदिवे, नाना पतुरे, महेश नाणेकर, शिवाजी धांडे, गणेश हंडगर, सुरज जाधव, श्रीकांत कोद्रे, शेखर शिंदे, नामदेव गडदरे, श्रीकांत शेंडे, विकास कदम, सुभाष आव्हाड यांनी केली असुन दाखल गुन्हाचा पुढील तपास अरविंद. कुमरे पोलीस उपनिरीक्षक हे करत आहेत.

