नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी मोबाईल. न. 9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे, दि. 30 मे:- ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानावर महापालिकेने 25 मे रोजी केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईचा संबंध हा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी सौ. वृषाली शिंदे यांच्याशी नाहक जोडून शिंदे कुटुंबीयांची बदनामी करण्याचे षडयंत्र धर्मराज्य पक्षाचे ठाणे शहर संघटक अजय जया यांनी केले आहे. मात्र प्रत्यक्षात वृषाली शिंदे या दुकानात खरेदीसाठी आल्याच नसल्याचे प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन नमूद केले. शिंदे कुटुंबाची बदनामी करण्यासाठी आणि त्यात नाहक आपल्याला गुंतवण्यासाठी अजय जया यांनी केलेल्या कारस्थानविरोधात प्रशांत सकपाळ यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झपाटा आणि लोकप्रियता यामुळे सैरभैर झालेले लोक अत्यंत खालच्या स्तराला गेल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे.
वृषाली शिंदे गुरुवारी ‘प्रशांत कॉर्नर’ येथे खरेदी साठी त्या दिवशी गेल्याच नव्हत्या. त्यानंतरही त्या गेल्या होत्या अशी अशी अवई अजय जया यांनी उठवली आहे. दुकानाबाहेर वाहन उभे करण्या वरून वृषाली शिंदे यांचे वाहनचालक व दुकानाचे सुरक्षारक्षक यांच्यात वाद झाला. त्यानंतर दुकानात टोकन घेण्यावरूनही त्यांचा वाद झाला अशी अफवाही जया यांनी पसरवली आहे. त्यानंतर खरेदी न करताच त्या रागारागाने तडक दुकाना बाहेर निघून गेल्या. त्यानंतर, अवघ्या अर्ध्या तासात ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी तिथे पोहोचले आणि त्यांनी थेट, ‘प्रशांत कॉर्नर’दुकानाच्या बाहेरील निवारा शेड व इतर बांधकाम उध्वस्त केले’, असा आरोप अजय जया यांचा आरोप केला आहे.
परंतु, जया यांनी केलेले सर्व आरोप निराधार, खोडसाळ असून अशी कोणतीही घटना घडलीच नसल्याचे प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात पत्रकार परिषद घेत त्यांनी वस्तुस्थिती मांडली आहे. प्रशांत कॉर्नर दुकानावर जी कारवाई झाली, ती महापालिका स्तरावर झाली असून आजूबाजूच्या दुकानांवरही झाली आहे. परंतु या कारवाईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील सौ. वृषाली शिंदे यांच्या नावाचा पत्रक काढून उल्लेख केला आहे, तो चुकीचा आहे. वृषाली शिंदे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्या तर आमच्या दुकानात कधीही आलेल्या नाहीत, किंबहुना मी त्यांना ओळखत ही नाही. माझ्या नावाचा आधार घेऊन या प्रकरणाशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबाचे नाव जोडून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले आहे. शिंदे कुटुंबीयांसह प्रशांत कॉर्नरची खोडसाळ बदनामी करणाऱ्या अजय जया यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशांत सकपाळ यांनी केली आहे. त्यामुळे केवळ शिंदे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा हा डाव आहे हे सूज्ञ ठाणेकर जाणतात.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा 9766445348-7385445348

