पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २४/०५/२०२३ रोजी सांयकाळी ०६.३० वा चे सुमारास फिर्यादी हे त्यांचे दारुच्या दुकानामध्ये काम करीत असताना इसम नामे अजय पांचाळ, तेजस वाडेकर, सोहेल आसंगी, गोविंद लोखंडे, सोन्या कांबळे, अमोल डावरे यांनी दुकानामध्ये येवुन फिर्यादी व मॅनेजर यांना शिवीगाळ करून अजय पांचाळ याने फिर्यादी यांचे दुकान मालकांना फोन करून “मी अजय पांचाळ असून मी आत्ताच जेल मधुन बाहेर सुटुन आलोय, तुला आलोय कळत नाही का होता चालु करायला. हप्ता चालु केला नाही तर तुला सोडणार नाही” अशी धमकी दिली. त्यानंतर वर नमुद सवीनी फिर्यादी यांचे दुकानातील दारुच्या बाटल्या, थंड पेयाच्या बाटल्या, काचेचे ग्लास, दगड फेकून दुकानातील दारुच्या बाटल्या, टीव्हीचे नुकसान केले. त्यानंतर अजय पांचाळ याने दुकानातील काऊंन्टनमधील असलेले दाहा हजर राहुन जबरदस्तीने घेवुन दुकानाचे बाहेर येवुन दगडी फेकुन आरडओरड केली आहे म्हणून फिर्यादी यांनी दिनांक २४/०५/२०१३ रोजी तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३२६/२०२३ मार्ददंवि कलम ३८५,३९२, ५०४, ५०६, ४२७ क्रिमीनल अमेन्टमेन्ट अॅक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, राहुल तांबे, विक्रम सावंत यांचे गोपनीय बातमीदारांचे मार्फतीने आरोपी १ सोहेल मोदीन आसंगी, वय २२ वर्षे रा इंद्रायणीनगर, अबेिगाव, पुणे २. अमोल तानाजी ढावरे, वय १९ वर्षे, रा. विश्व हाईटस, जामुळवाडी रोड, आंबेगाव, पुणे ३. आदित्य उर्फे सोन्या खंडू कांबळे, वय २० वर्षे, रा. हनुमाननगर, जाभुळवाडी रोड, आंबेगाव, पुणे यांचा शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना अटक केली असुन गुन्हयातील विधीसघषीत बालकाना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा नारायण शिरगावकर सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील परिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तरोब पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाल, सविन धामणे, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, राहुल तांबे, चिकन सावंत, शैलेश सावे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अबधुत जमदाडे, सचिन सरपाले, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, नितीन जाधव यांच्या पथकाने केली आहे.

