युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील कळमेश्वर येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील नगर परिषदेच्या जलतरण केंद्रात पोहत असताना एका तरुण डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डॉ. राकेश दुधे असे मृतक डॉक्टरांचे नाव असून ही घटना ता.३१ मे बुधवार ला सायंकाळी सहा वाजता घडली. या घटनामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे की, डॉ. राकेश दुधे वय 41 वर्ष राहणार कळमेश्वर मृतकाचे नाव असून डॉ. दुधे यांचा कळमेश्वर स्टेशन रोडवर श्री हॉस्पिटल आहे. ते नेहमीप्रमाणे सायंकाळी सहा वाजता कळमेश्वर नगरपरिषदेच्या जलतरण केंद्र पोहायला गेले असता त्यांचा तोल गेल्याने ते तलावात पडले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या प्रशिक्षकाला त्यांनी हात हलवून आपण तलावात दुबत असल्याचा इशारा दिला. यावेळी प्रशिक्षकाला ताबडतोब तिथे धाऊन गेले, परंतु नाका तोंडात पाणी गेल्याने डॉ. दुधे हे बेशुद्ध झाले. या अवस्थेत डॉ. राकेश दुधे यांना तातडीने बाजूला जवळच असलेल्या कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले. कळमेश्वर येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या तलावाचे बांधकाम पूर्ण होऊन तीन वर्षे बंद असलेले या जलतरण केंद्राचा नुकताच मार्च २३ ला शुभारंभ करण्यात आला होता. याच्या संपूर्ण देखरेखीची जबाबदारी साई अक्वाटेक कन्सल्टन्सी नागपूर यांच्याकडे देण्यात आली होती. सध्या स्थितीत जलतरण केंद्रामध्ये महिला पुरुष व लहान मुले असे एकूण तीनशे सदस्यांची नोंदणी केली होती. या जलतरण केंद्रावर दोन प्रशिक्षक होते. या तरुण डॉक्टरांच्या मृत्यूची बातमी कळमेश्वर शहरांमध्ये वाऱ्यासारखी पसरल्याने शहरातील असंख्य नागरिकांनी जलतरण केंद्राकडे धाव घेतली. कळमेश्वर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अधिक तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे.
प्रतिक्रिया
शहर भाजप महामंत्री
प्रशांत इखार, म्हणतात, या जलतरण केंद्रात पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकाकरिता कुठलीही सोयी, सुविधा नसून येथील कंत्राटदार पैसे घेऊन सुद्धा या सोयी उपलब्ध करू न शकल्याने या तरुण डॉक्टराचा बळी गेला असून पालिकेने जलतरण केंद्राचा कंत्राट रद्द करून कंत्राटदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.