✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो. न. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- 1 जून जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम सामान्य रुग्णालयाच्या वतीने जागतिक तंबाखु विरोधी दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या मार्गदर्शनात रांगोळी स्पर्धा व प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय येथून डॉ. प्रविण धमाने व डॉ. राऊत यांनी प्रभातफेरीला हिरवी झेंडी दाखवून प्रभातफेरीचा शुभारंभ केला. प्रभातफेरी शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करुन सामान्य रुग्णालय येथे सांगता करण्यात आली. या प्रभातफेरी मध्ये दंत शल्य चिकित्सक डॉ. कोडापे, डॉ. नासरे, राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. नम्रता सलुजा, सामाजिक कार्यकर्ता हर्षद ढोबळे, समुपदेशक राहुल बुचुंडे, श्री. रावलानी, निशिकांत होरे, जिल्हा परिचर्या प्रशिक्षण पथक, कासाबाई नर्सिग विद्यालयाच्या विद्यार्थीनी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला.
त्यानंतर सामान्य रुग्णालय येथे रांगोळी स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले, कार्यक्रमाला सामान्य रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन राहुल बुंचुडे यांनी केले.