संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथे अवैधरित्या वेश्या व्यवसाय जोर धरत आहे. अशाच एका अवैध देह व्यापाराच्या अड्ड्यावर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाने छापा टाकून यावेळी तेथून एका अल्पवयीन मुलीसह दोघींची सुटका करण्यात आली. तर दलाल दोन महिलांसह तीन जणांना अटक करण्यात आली.
वाठोडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या शंकरनगर येथील सदगुरू लॉनजवळ एका घरात विद्या धनराज फुलझेले वय 42 वर्ष नावाची महिला देहव्यापाराचा अड्डा चालविते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या माहितीची खातरजमा केली. त्यासाठी एका डमी ग्राहकाला पोलिसांनी ग्राहक बनवून विद्याकडे सौदा करण्यासाठी पाठवले. आरोपींनी 3 हजार रुपयांत अल्पवयीन मुलीचा सौदा करून ग्राहकाला भाड्याने घेतलेल्या रूमवर बोलावले.
पोलिसाना या अवैध देहव्यापार अड्डाचा पूर्ण खातरजमा व ग्राहकाचा इशारा मिळताच पोलिसांनी त्या घरावर धाड टाकली. तेथे सीमा सुधाकर सहारे वय 31 वर्ष राऊत नगर व सुधाकर श्रीराम नरुले वय 51 वर्ष, आनंदनगर, जरीपटका हेदेखील आढळले. पोलिसांनी तेथून 14 वर्षे व 19 वर्षे वयाच्या दोन मुलींची सुटका केली. आरोपी मुलींच्या आर्थिक स्थितीचा फायदा उचलत त्यांना देहव्यापारात ढकलायचे. या तिन्ही आरोपीं विरोधात पिटा व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत वाठोडा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
विद्या ही मागील अनेक दिवसांपासून देह व्यवसायात सक्रिय आहे. यापूर्वीही पोलिसांनी तिला अटक केली होती. ही कारवाई पोलिस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात डीसीपी मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख रेखा संकपाळ, समाधान बळबजकर, दीपक बिंदाने, मनीष पराये, सुनील वाकडे, आरती चव्हाण, अश्विनी खोडपेवार, शरीफ शेख, ऋषिकेश डुमरे आणि सुधीर तिवारी यांच्या चमूने ही कारवाई केली.

