मधूकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील नागेपल्ली येथील मंगेश बाळकृष्ण गुळदे यांची तब्बेत ठीक नसल्याने हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्यासाठी पैशाची अडचण होती त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण होत होती. मंगेश बाळकृष्ण गूळदे यांच्या प्रकृतीची माहिती नागेपल्ली येथील आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्तेकडून आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती दिली, माहिती होताच त्यांच्या आई सौ. अंजना बाळकृष्ण गूळदे यांना अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात बोलवून रुग्णालयात उपचाराकरिता आर्थिक मदत केली.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, अरफाज शेख, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, विनोद रामटेके, रवी भोयर, राकेश सडमेक, सडवल्ली दुर्गम, जांपन्न कुम्मारी सह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348. 7385445348