राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील जिवती तालुक्यातील पुनागुडा येथे व सोबत संपूर्ण तालुक्यात तालुका कृषी विभागाने गतीमान पाणलोट विकास कार्यक्रम राबविला परंतु या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला दिसुन येत आहे. शेतात ढाळीच्या बांधासोबत नाली काम केले नसुन मापन पुस्तका मध्ये परीणामी नालीची सुद्धा नोंद करुन शासनाचा उपलब्ध निधी तुन स्वतःची खिसे भरुन घेतले. व शेतकरी बांधवांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे काम जिवती तालुका कृषी विभागाने केले आहे.
पुनागुडा व तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये नाली न टाकता फक्त ढाळीचे बांध ट्रॅक्टर ने शेतातील माती नांगरुन ती शेताच्या काठाला नेऊन बांध टाकले सदरचे ढाळीचे बांध हे जेसिबी ने नाली खोदकाम करुन नालीची निघालेली मातीचा बांध टाकले नाही. ढाळीचे बांधासाठी शेतकर्यांची शेती अंदाजे १० ते २० मिटर लांब व अंदाजे २ते३ फुठ खोली जमीनीतील माती काढुनी ढाळीचे बांध तयार केले असल्यामुळे बांधालगतची १०ते २० मिटर शेताच्या चारही बाजुची जमीन अकुशक झाली अस ढाळीच्या बांधामुळे पावसाळ्यात संपुर्ण पाणी शेतात जमा होऊन शेताचे तळे होत आहे आणी यामुळे पिकाच्या मुळा कुजुन पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. आणी मागिल वर्षी प्रमाने दरवर्षी हे नुकसान होतच राहणार आहे.
तालुक्यात शेकडोच्या संख्येत व त्यापैकी पुनागुडा गावात ४ माती बांध टाकले गेले परंतु माती बांधाला सिओटी खोदकाम न करता मापन पुस्तकात नोंद केली व माती बांधाला काळी माती न वापरता व पिंचींग ला दगड स्थानीक चा वापरुन गौण खणीजाची ५० कि.मी वरुन वाहतुक केल्याचे खोटी नोंद. माफक पुस्तकात नोंद करुन कृषी विभागाच्या सक्षम अधीकारी व सहकारी यांनी निधीची उधळपटृटी करुन आपले खिसे भरले शेतकर्याच्या होनारी नुकसानभरपाई हि कृषी विभागाने द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348