रखडलेल्या पुलाच्या बांधकामाचा आक्रोश जनतेनी काढला सार्वजनिक बांधकाम विभागावर मोर्चा
तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी मो. 9822477446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यापासून नजदीक बरेच दिवसांपासून जनता त्रस्त असलेला माथरा गोवरी मार्गावरील जुने पुल तोडून नवीन पुलांचे बांधकाम चालू आहे. परंतु ते काम अत्यंत संथगतीने चालू आहे पावसाळा येऊन ठेपला असून दोन्ही पुलांचे काम अपूर्ण आहे आणि एकदा पाऊस चालू झाला की रखडलेल्या पुलाच्या कामामुळे तालुक्यापासून अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे आणि जनतेला विद्यार्थ्यांना रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्रशासना वर नागरिक मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत आहे. या रखडलेल्या कामासाठी सभापती सुनील उरकुडे यांनी संबंधित विभागांना अनेकदा पत्रव्यवहार करून आंदोलने सुद्धा केली परंतु नजदीक पावसाळा येऊन सुद्धा पुलांचे काम अपूर्ण राहिली.
त्याच अनुषंगाने आज दि. 6 जून रोजी जनतेचा आक्रोश सार्वजनिक बांधकाम विभागावर धडकला चक्क कार्यालयाला ताला ठोकण्यात आला. हे आंदोलन बराच वेळ चालू राहले नंतर पोलिस प्रशासनाने त्याची दखल घेऊन बांधकाम विभागाशी चर्चा करून संबंधित कंपनीच्या वतीने कालावधी नीच्छित म्हणजे 15 तारखेपर्यंत एक तर 25 तारखेपर्यंत दुसरे पूल करून देण्याचे हमीपत्र लिहून दिले.
त्या आश्वासनानंतर बोलताना माजी सभापती सुनील उरकुडे म्हणाले की दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास जनतेचा आक्रोश वाढेल आणि होणाऱ्या कार्यवाहीसाठी संपूर्णतः प्रशासन जबाबदार असेल. सदर आंदोलन प्रसंगी सभापती सोबत हरिदास झाडे सरपंच माथरा, हरीचांद्र जूनघरे, दीपक झाडे, नागेश्वर ठेंगणे अध्यक्ष सेवा सहकार संस्था गोवरी, शंकर बोढे ग्रामपंचायत सदस्य गोवरी, अविनाश उरकूडे, अशोक भगत, मारखंडी लांडे, भास्कर इटनकर, भूषण जुनघरे, श्रीकांत मदनेलवर, समीर इटकेलवार, सुरेंद्र पिंपलकर, केतन बोभाटे, मारोती लांडे तथा गोवरी येथील महिला पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी होते.