पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणेचे हदीमध्ये दिवसा घरफोडी चोरीचे घटना घडीत असताना त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन तपास पथकातील अधिकारी य अमलदार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सी सी टी व्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषन गुप्त बातमीदार याचेकडे याचे मार्फतीने आरोपीचा शोध घेत असताना दि.३१/०५/२०२३ रोजी तपास पथकातील अमलदार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग डयुटी करीत असताना पोशि १०५१० शेडगे, पोशि ८६०० चव्हाण, पोशि कोंडे यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, अर्णय मेडीकल नन्हे पुणे येथील बंद प्लॅट मध्ये चोरी करणारा इसम अंगामध्ये निळ्या रंगाचा टि शर्ट व फिकट निळ्या रंगाची जिन्स घातलेला इसम हा सेल्फी पाईंट नन्हे सर्व्हिस रोड पुणे येथे पाढऱ्या रंगाच्या दुचाकी अॅक्टीव्हा गाडीवर बसलेला असुन तीचा नंबर बनावट आहे. अशी बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी तपास पथकाचे सपोनि सचिन निकम यांना कळविली असता त्यांनी सदरची बातमी वरिष्ठांना कळवून वरिष्ठांनी योग्यती कारवाई करण्याचे आदेशित केल्याने सदर बातमीच्या ठिकाणी जावून मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता बातमीत नमुद वर्णनाच्या इसमाला आमची येण्याची चाहुल न लागु देता त्यांला आहे त्या परिस्थीतीत वरील स्टॉफचे मदतीने दि. ३१/०५/२०२३ रोजी २०/३० वा ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता मयुर ऊर्फ अमित ऊर्फ बंटी सोपान मुंडे वय ३६ वर्षे रा. केळेवाडी विश्वशांती चौक सर्वे नं ४४ कोथरुड पुणे, सध्या मैत्री मेडीकलचे पाठीमागे, मेठेकर यांची चार मजली ईमारत, तळमजला, संभाजीनगर, धनकवडी पुणे असे असल्याचे सांगितले, त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे अधिक तपास करता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेकडे पोलीस कस्टडी मध्ये अधिक तपास करता त्याने खालील एकुण ०४ गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
१) सिहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं १८२/२०२३ मा द वि कलम ४५४, ४५७,३८० २) सिहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं २०३ / २०२३ मा द वि कलम ४५४.३८०. ३) सिहगड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं २०४ / २०२३ भादवि कलम ४५४, ३८०. ४) सिहगडरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं २४४ / २०२३ भादवि कलम ४५४.३८०,
वरील गुन्हे केले असल्याचे सांगुन त्याने सदर घरफोडी चोरी मधील २,५०,०२०/- रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे व गुन्हा करताना वापरत असलेले वाहन २०,०००/- रुपये त्याचे कडुन जप्त करण्यात आले असुन असा एकुण २,७०,०२०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पुढील अधिक तपास सपोनि सचिन निकम, सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. रितेश कुमार सो, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर मा. संदिप कर्णिक सो, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील सो, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर मा. सुहेल शर्मा सो, पोलीस उपआयुक्त परीमंडळ -३ श्री राजेंद्र गलांडे सोो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग, श्री अभय महाजन सो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री जयंत राजुरकर सो. पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, विकास बांदल, विकास पांडुळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, अमित बोडरे, राजाभाऊ वेगरे, अमोल पाटील, सागर शेडगे, देवा चव्हाण, स्वप्नील मगर, अविनाश कोंडे, दक्ष पाटील, यांचे पथकाने केली.

