ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- आई ही आपल्या मुलासाठी आई असते, आपल्या मुलावर कुठलेही संकट आले की ती त्याच्यासाठी जीवाचे रान करण्यात मागे पुढे पाहत नाही. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील महिंदळे गावात 11 जून ला मध्यरात्री च्या सुमारास अचानक बाळाचा रडण्याचा आवाज आला त्यामुळे आई झोपेतून जागी झाली. आणि बाळाकडे बघताच क्षणी तिच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण तिच्या चार महिन्यांच्या चिमुकल्या बाळाच्या अंगावर विषारी कोब्रा नाग फणा मारून बसलेला होता. आपले बाळ संकटात आहे हे बघून आईने क्षणाचाही विचार न करता या विषारी कोब्रा नागाला हातात पकडले आणि बाळाच्या अंगावरून फेकले. बाळाचा जीव वाचला मात्र यात या विषारी नागाने आईला दंश केला. त्यामुळे या जीवन मरणाची मातेची झुंज सुरू झाली. तब्बल 6 दिवस मृत्यूशी झुंज देत ती आज सुखरूप आहे.
काय आहे हे प्रकरण…? महिंदळे गावातील भिकन नरसिंग राजपूत यांची कन्या ज्योती हिचे सासर बांभोरी, ता. एरंडोल येथील आहे. काही दिवसांपूर्वी ती बाळंतपणासाठी आपल्या माहेरी आलेली आहे. दोन महिन्यापूर्वी तिला पुत्ररत्न झाले होते. मात्र, गेल्या आठवड्यात शरीराचा थरकाप उडवणारी घटना घडली. संपूर्ण कुटुंब पहाटेच्या सुमारास साखर झोपेत होते. यावेळी घरात ज्योती आणि तिचे दोन महिन्याचे चिमुकले बाळ एकाच खाटेवर झोपलेले होते. पहाटे 5 वाजताच्या सुमारास अचानक बाळ रडण्याचा आवाज आला आणि ज्योती झोपेतून खाडकन जागी झाली. झोपेतून जाग आल्यावर पाहते तर काय, तिला आपल्या बाळाच्या अंगावर फणा घातलेला कोब्रा जातीचा अतिविषारी नाग दिसला. ज्योतीने क्षणाचाही विचार न करता नागाला हातात पकडून दूर फेकले.
यात तिला नागाने दंश केला आणि काही कळण्याच्या आतच ती अस्वस्थ झाली. कुटुंबियांनी तातडीने ज्योतीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्रकृती खालावल्याने तेथून पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्योती हिला वेळीच सर्पदंश विरोधी लसीची इंजेक्शन देण्यात आली. परंतु, सर्प अतिविषारी असल्यामुळे ज्योती हिची मृत्यूची झुंज सुरू होती. अखेर 6 दिवसांनी तिची प्रकृती आता बरी झाली असून बाळ देखील ठणठणीत आहे.
आमची मुलगी ही झाशीच्या राणीसारखी आहे. तिने जे केलं ते आईच करू शकते. बाप म्हणून मी देखील घाबरलो होतो. मात्र, तिने तिच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाचे प्राण वाचविले आहे हे आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया ज्योतिच्या आईवडिलांनी दिली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या आणि प्रतिनीधी बनण्याकरीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 976645348/7385445348