राज शिर्के मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रीपती ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तर पँथर आनंद नवसागरे ठाणे जिल्हा निमंत्रक तथा कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जनआक्रोश निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
जातीवादातून झालेले बोंडार हवेली जिल्हा नांदेड येथील अक्षय भालेराव यांचे खून प्रकरण, मुंबई येथील सावित्रीमाई फुले वसतिगृहात बलात्कार करून करण्यात आलेली बौध्द तरुणीची हत्या, परभणीतील जातीसुडाने चोर समजून करण्यात आलेली शिकलकरी समाजाच्या मुलाची हत्या, रेणापूरमधील तीन हजार रुपये न दिल्याने गुंड सावकाराने मातंग समाजाच्या गिरिराज तपघाले या मुलास मिरचीची पूड टाकून लोखंडी रॉडने जाती द्वेषाने करण्यात आलेली क्रूर हत्या अश्या अनेक घटनांचा तीव्र शब्दात निषेध या मोर्चात करण्यात आला.
डोंबिवली पश्चिमेतील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. तेथून मोर्चा दिनदयाळ रोड मार्गे पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पुलावरून मार्गक्रमण करीत केळकर रोड मार्गे इंदिरा चौक येथील असलेल्या महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याकडे मोर्चाची निषेध सभा घेऊन सदर समाप्ती करण्यात आली.
या वेळेस गृहमंत्र्यांनी व मुख्यमंत्र्यांनी सदर घटनेची तत्काळ दखल घेत पीडित कुटुंबाची भेट घेण्याच्या मागणीसह, पीडित कुटुंबास पन्नास लाखांची मदत शासनाकडून मिळण्यात यावेत, सदर खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालण्यात यावा, त्यांचा तपास आयपीएस सारख्या किंवा सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीशांच्या माध्यमातून व्हावा, पीडित कुटुंबाच्या घरातील एका सदस्यास शासकीय नोकरी सेवेत घेण्यात यावे अश्या अनेक मागण्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या. सबंध मोर्चात राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या घोषणांनी सदर सारा परिसर दणाणून गेला होता.
मोर्चा केळकर रोड येथील चौकात येताच कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडून रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.पोलिसांच्या मदतीने सदर मोर्चा पुढे नेण्यात आला.या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रीपती ढोले, पँथर आनंद नवसागरे ठाणे जिल्हा निमंत्रक/कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष यांच्या सह राहुल नवसागरे डोंबिवली विधानसभा अध्यक्ष, नितीन साबळे शहर संघटक, तुषार बनसोडे महासचिव, ज्ञानेश्वर खडसे कल्याण डोंबिवली शहर संघटक, युवराज वाटूरे शहर संघटक,अर्जुन जाधव डोंबिवली उपाध्यक्ष, सुभाष शिरसाट युवा नेते, दीपक भालेराव, महीला आघाडीच्या जयमाला काशिदे, सुवर्णा जाधव, छबूबाई नवसागरे, शारदाताई पवार, शोभाबाई शिरसाट,प्राजक्ता शिंदे, गंगुबाई डांगे, कुणाल नाईक, सुरेश सावंत, स्वप्नील शिर्के,राजू टेकाळे, सुधाकर इंगोले, शशी पवार, विजय पंडित,अनिल सावंत, महेंद्र मोरे, प्रशांत टेकुळे, राहुल सावंत, मुंजा शेळके, भागिरथ धबाले यांच्यासह अनेक रिपब्लिकन सैनिक महिला युवा कार्यकर्ते शेकडोंनी उपस्थित होते.सदर मोर्चाचे आयोजन रिपब्लिकन युवा सेनेचे डोंबिवली शहर युवा अध्यक्ष अरुण शिरसाट व संदीप हेलोडे (डोंबिवली शहर युवा संघटक) यांनी केले होते. या वेळेस राष्ट्रीय कामगार युनियनचे लक्ष्मण हजारे, वंचित बहुजन माथाडी ट्रांस्पपोर्टचे ठाणे जिल्हा अध्यक्ष गौतम गवई, संभाजी ब्रिगेडचे डोंबिवली शहर अध्यक्ष गोवर्धन पाटील, अविनाश वाघमारे यांनी सदर मोर्चास पाठिंबा दिला.प्रशासनाकडे सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मागणी करीत व पोलीस प्रशासनाचे, वाहतूक कर्मचाऱ्यांचे, पत्रकारांचे आभार मानित सदर मोर्चाचा समारोप करण्यात आला.