पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०९/०६/२०१३ रोजी कोणीतरी अज्ञात चोरटयाने लबाडीच्या इरादयाने फिर्यदी व साक्षीदार यांचे राहते घराचे दरवाजांचे रहाते घराचे कुलूप कशाचेतरी सहाय्याने तोडुन फिर्यादी यांचे घरामधुन सोन्याची चैन, सोन्याची नथ असा एकूण १,२६,०००/- रुपये किया ऐवज तसेच साक्षीदार यांचे घरामधुन २६५००/- रुपये किंमतीचे सोन्याची अंगठी व चांदीचे दागिने असा एकूण १,५२,५००/- रु किये दागिन्यांची चोरी केली होती. सदरबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३५८ / २०२३ भादवि कलम ४५४.३८० अन्वये गुन्हा दाखल आहे.दाखल गुन्हयातील आरोपीतांचा पोलीस अंमलदार, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी, अवधुत जमदाडे हे शोध घेत असताना त्यांना सदरचा गुन्हा रेकार्डवरील आरोपी अमीर समीर पठाण ऊर्फे लकी, वय २४ वर्षे, रा. संतोषी माता मंदीराचे मागे, कात्रज, पुणे याने केला असल्याची खात्रीशीर माहीती मिळाली. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीताचा शोध घेवून त्यास अटक केली आहे.
आरोपी अमीर समीर पठाण, ऊर्फ लकी हा पुणे शहरामध्ये दिवसभर फिरत असे व तेथील बंद घरे हेरून त्या घरांची कुलुपे सोडुन तेथुन सोने, चांदीचे दागिने चोरी करीत असे. अशा प्रकारे आरोपीताने दानगर, चनकवडी आंबेगाव पठार, कात्रज, सच्चाईमाचा आंबेगाव, पुणे या रहीवाशी भागात दिवसा फिरन तेथील बंद घरांची कुलपे फोडुन सोने चांदी दागिन्यांची चोरी केले आहे.
आरोपीकडुन एकुण ०५ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असुन गुन्हयातील चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चैन, अंगठया कानातील झुमके, हार, सोन्याचे मणी असा एकुण ७० ग्रॅम वजनाचे ४ लाख रुपये किये सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.आरोपीकडुन उघडकीस आलेले गुन्हे खालील प्रमाणे आहेत.
१. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३५८/२०२३ भादंवि कलम ४५४.३८०
२. भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २३९/२०२३ भादवि कलम ३८०४५४
३. भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३२३ / २०२२ मादवि कलम ४५४,४५७,३८०
४. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३६६ / २०२३ भादंवि कलम ४५४,३८०
५. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३६८/२०२२ भा. द वी कलम ४५४,३८०
आरोपी अमीर समीर पठाण ऊर्फे लकी हा रेकॉर्डवरील आरोपी असून, त्याचेवर पुणे शहरात घरफोडी पोरींचे एकुण०९ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे श्री नारायण शिरगावकर यांच मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, गौरव देव पोलीस अंमलदार, वधुत जमदाडे, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, सचिन सरपाले, शैलेश साठे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, सचिन गाले, धनाजी धोत्रे, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

