उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- शासकीय उप जिल्हा रुग्णालयात काम करणारे कंत्राटी सफाई कामगार यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचार थांबवून त्यांच्या वेतनामध्ये वाढ करून त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करून त्यांना न्याय देण्याबाबत सेवक आरोग्य कामगार संघटनेकडून निवेदन देण्यात आले.
संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष उमरफारुक ककमरी यांच्या आदेशानुसार सांगली जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे यांच्या नेतृत्वाखाली हरिश वाघमारे यांनी कंत्राटी सफाई कामगार यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरूद्ध निवेदन दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांचे महत्व हे कोरोना सारख्या महाभयंकर विषाणू विरूद्ध लढताना समजले आणि त्या महाभयंकर परिस्थितीत आरोग्य सेवकास सर्व सामान्य नागरिकांकडून देव दुत म्हणुन भावनिक करणारे वातावरण निर्माण झाले परंतू कालांतराने हे भावनिक करणारे वातावरण संपुष्टात येत गेले पण आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक आरोग्य सेवकास हे महित आहेच कि कोरोना हा एकच रोग/विषाणू नसुन टि.बी.,एच.आए.व्ही., कर्करोग अशा अनेक प्रकारचे रोग/विषाणू असुन आरोग्य सेवक हा आपल्या जीवाची/परीवाराची पर्वा न करता आरोग्य सेवा हि देव सेवा समजुन सेवा करत आहेत विषेतः सफाई सेवक, रूग्णापासुन ते संपूर्ण रूग्णालय स्वच्छ आणि निरोगी ठेवतात आणि सफाई करत असताना रूग्णाला वापरण्यात आलेले इंजेक्शन, सलाइन, ड्रेसिंग करताना वापरलेले साहित्य इत्यादी हताळतात हि सर्व सेवा देत असताना एखाद्या रोगाची लागण झाल्यास काय? हा आरोग्य क्षेत्रातील सफाई सेवकावर येणारा मोठा प्रश्न आहे, त्याच्या पश्चात त्याच्या परिवाराचे काय? अशा अनेक समस्यांवर/प्रश्नांवर दुर्लक्ष करून हि आरोग्य सेवक आपली जबाबदारी प्रामाणिक पणे पर्ण करत आहेतच मान्यवर वरील नमुद सर्व बाबींवर विचार केला तर आरोग्य सफाई सेवकास काम महत्वाचे आणि धोक्याचे दिले जाते पण त्यांचा वेतन, सुरक्षा आणि सन्मान मात्र काहीच नसल्यात जमा आहे म्हणुन आम्ही आमच्या सेवक आरोग्य कामगार संघटनेकडून काही मागण्या आपल्या पुढे मांडत आहे ते पुढील प्रमाणे:
१) आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक सेवकास विषेतः कंत्राटी सेवकांच्या काम करण्यास लागणारे साहीत्य हे उच्च दर्जेदार आणि वेळोवेळी दिले गेले पाहिजे.
२) आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक सेवकासाचे विषेतः कंत्राटी सेवकांचे आरोग्य विमा आणि अपघाती विमा किमान पाच लाखाचा उतरवावा.
३) आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक आरोग्य सेवकास विषेतः कंत्राटी सेवकांच्या वेतनामध्ये योग्य वाढ करून मिळावी.
४) कामाच्या मर्यादित वेळेतच काम करून घ्यावे ज्यादा वेळ काम केल्यास ओव्हरटाईम घृहित धरून वेतना मध्ये वाढ होवून वेतन मिळावे.
५) कोणत्याच आरोग्य सेवकास कामावरून तात्काल काढु नये त्याची पर्व सूचना देण्यात यावी.
वरील आमच्या मागण्यावर सकारात्मक विचार करून सकारात्मक निर्णय घेऊन आरोग्य सेवकास २५ जुन २०२३ पर्यंत दिलासा द्यावा अन्यथा २६ जुन २०२३ पासुन आम्हास आरोग्य सेवकांच्या हितासाठी लोकशाही आणि संविधानिक मार्गाने लढा उभा करावा लागेल याची पूर्णतः जबाबदारी हि आपलीच राहील याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला.
त्यावेळेस जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष हरीश वाघमारे, कवठेमहांकाळ तालुका महासचिव प्रथमेश बनसोडे, प्रशांत कांबळे, अलोक कांबळे, आकाश भोसले, वंदना सुभाष कांबळे,प्रमिला माणिक जामदाडे,अनिता रावसाहेब कुंभार, नंदा शंकर जावीर, गणेश मल्हारी केंगार आदि उपस्थित होते.

