पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक 16/06/2023 रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार खून खुनाचा प्रयत्न रॉबरी घरफोडी चेन्स स्नॅचिंग सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेणे आदेशित केले होते त्या अनुषंगाने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी ,नामदेव रेणुसे, उत्तम तारू कात्रज भागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व नामदेव रेणुसे , यांना त्यांचे बातमीदार मार्फत बातमी मिळाली की सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे शुभम उर्फ सुहास गोरख जाधव हा त्याच्या राहत्या गावी :मुक्काम पोस्ट वागळवाडी ,तालुका बारामती, जिल्हा पुणे. येथे असल्याची खात्री लायक बातमी मिळाल्याने लागलीच बातमीचा आशय युनिट 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री क्रांतीकुमार पाटील साहेब यांना कळविले असता त्यांनी ताब्यात घेणे आदेशित केल्याने सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले वरील स्टाफच्या मदतीने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता बातमीच्या वर्णनातील आरोपी हा त्याच्या राहत्या घरात मिळताच वरील स्टाफच्या मदतीने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले आसता त्याने त्याचे नाव हा शुभम उर्फ सुहास गोरख जाधव वय वर्ष 27 राहणार मुक्काम पोस्ट वाघळवाडी , तालुका: बारामती जिल्हा, पुणे. असे सांगितले. आरोपीस गुन्हे शाखा युनिट दोन कार्यालय येथे नेऊन चौकशी करता सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 59/2017 भा द वि कलम 399, 402 ,आर्म ऍक्ट 4 (25),37 (1) (3) सह 135 वरील गुन्ह्यात पाहिजे असल्याने वैद्यकीय तपासणी करून संबंधित पोलीस स्टेशनला इंट्री नोंद करून ताब्यात दिले आहे .
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार सो अप्पर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे सो पोलीस उपआयुक्त पुणे श्री अमोल झेंडे सो सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुनील पवार सो गुन्हे 1 युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स पो नि वैशाली भोसले,पोलिस अंमलदार उज्वल मोकाशी ,नामदेव रेणुसे उत्तम तारू, गजानन सोनुने या पथकाने केली आहे

