Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

लघु व्यावसायिक अतिक्रमण धारकांवरील अन्याय दूर करा: आम आदमी पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 21, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
लघु व्यावसायिक अतिक्रमण धारकांवरील अन्याय दूर करा: आम आदमी पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सागर शिंदे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- गेल्या काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने शहरातील अतिक्रमण काढून, रस्त्यावर लघु व्यवसाय करणाऱ्यांच्या साहित्याची जप्ती केली जात आहे. लघु व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देत, त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राम पाटील डोरले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, वाशिम जिल्हा हा देशात आकांक्षित जिल्ह्यांच्या क्रमवारीत 11 व्या स्थानावर आहे. त्यामुळे येथे रोजगाराच्या फारशा संधी नसल्यामुळे विकासाचा आलेख मंदावल्याचे दिसून येते. त्यात वाशिम जिल्ह्यातील नगर परिषदा व नगरपंचायतींनी शहरातील अतिक्रमण हटवून लघु व्यावसायिकांचा रोजगार हिरावला आहे. जिल्ह्यातील शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी अतिक्रमण हटविण्यात आले. परिणामी, शहरातील शेकडो हातगाडीवर लघु व्यवसाय करणाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. एकीकडे नगर परिषद, नगरपंचायती लघु व्यावसायिकांकडून बैठक पट्टी वसूल करून घेते. त्यांच्याकरिता विविध योजना असल्याचे पॉम्प्लेट्सद्वारे जनजागृती करते. तर दुसरीकडे लघु व्यावसायिकांची छोटी दुकाने, हातगाड्या रस्त्याच्या कडेला लावल्या तर त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जाते, असा दुजाभाव प्रशासना कडून केला जात असल्यामुळे त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

अतिक्रमण हटाव मोहिम फक्त गोर-गरिबांसाठीच का? अतिक्रमण मोहिम फक्त गोर – गरिब हातगाडीवर लघु व्यवसाय करणाऱ्यांसाठीच राबविण्यात आली. शहरातील धनदांडगे, राजकीय वरदहस्त लाभलेल्यांच्या अतिक्रमणाला धक्का सुद्धा लावण्यात आला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे देखील लक्ष देणे गरजेचे असल्याची बाब या निवेदनात नमूद केली आहे.

Previous Post

अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकुण ७,३८,८००/- रुपये किंमतीचा २९ किलो गांजा केला जप्त…

Next Post

आमच्या गावाला वाचवा हो, अशी पुकार घेऊन चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या शेकडो महिला.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आमच्या गावाला वाचवा हो, अशी पुकार घेऊन चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या शेकडो महिला.

आमच्या गावाला वाचवा हो, अशी पुकार घेऊन चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या शेकडो महिला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In