✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वडनेर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत पाऊस पाणी संकलन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले जेव्हा पाऊस येतो तेव्हा छतावरील पावसाचे पाणी खाली पडून वाया जात असते त्यामुळे शासनाच्या संकल्पनातून इमारतीवरील पाणी वाया न जाऊ देता शोष खड्ड्यामध्ये घेऊन पाण्याचा निचरा केला जाईल व जमिनीमधील पाण्याची पातळी वाढेल. गावातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरी हा प्रकल्प करावा अशी शासनाची संकल्पना असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय वडनेर कामाचा डेमो पाणी पाऊस संकलन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे भूमिपूजन सौ. कविताताई वानखेडे सरपंच ग्रामपंचायत वडनेर, सुभाष शिंदे उपसरपंच ग्रामपंचायत वडनेर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विनोदर वानखेडे ग्रामविकास अधिकारी श्री रामटेके, शैलेश शेंडे तांत्रिक अधिकारी आरिफ शेख, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते या योजनेला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी असून कामाचे ठिकाण ग्रामपंचायत वडनेर आहे.

