प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील समुद्रपूर तालुक्यातील गिरड परिसरात अचानक झालेल्या मेघगर्जेनेमुळे झालेल्या पावसात वीज पडून गोपाल कासार यांच्या जागीच मृत्यू झाला. गिरड येथील शेतकरी भाऊराव तेलरांधे यांच्याकडे गुऱ्हे चारायला मजुरीचे जात होता. फरीदपूर तलावामध्ये गाई चारत असताना सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या पावसात गोपाल कासर यांचा अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यु झाला.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यानी मृतक कासार त्यांचा राहत्या घरी गिरड येथे जाऊन कासर परिवाराचं सात्वन केलं आणि ताबडतोब प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलून गोपाल कासार हा घरचाकर्ता असल्याने त्याचा कुटुंबावर आघात झाला आहे त्यांना शासनाकडून त्यांचा कुटुंबाला आर्थिक मदत तात्काळ करा असे बोलने केले. शासनाकडून तात्काळ मदत मिळेल अशी ग्वाही कुटुंबाला अतुल वांदिले यांनी दिली.
मृतक गोपाल कासर यांना दोन मुली, पत्नी, आई असा मोठा परिवार आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गिरड येथील उपसरपंच मंगेश गिरडे, निलेश खाटीक, प्रवीण गुंडे, राजू झिंगरे, आकाश बावणे, मारोती वंजारी, लक्ष्मण भोयर आदी उपस्थित होते.

